पीएम किसान समान निधी योजना पुढील हप्ता | What is ekyc in PM Kisan Yojana ?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल पीएम किसान सम्मान निधि योजनेचा पुढील हप्ता 25 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ट्रान्सफर केला जाणार आहे. तुम्ही सुद्धा येणाऱ्या पुढील हफ्त्याची वाट पाहत असाल तर या ठिकाणी पीएम किसान सम्मान निधि योजनेमध्ये PM KISAN EKYC असा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. तर नेमका ई-केवायसी बद्दल काय असेल? कुठल्या शेतकऱ्यांसाठी लागू असेल? कोणी कोणी ई-केवायसी करायची आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

eKYC is MANDATORY for PMKISAN Registered farmers. Pls. Click eKYC option in Farmer Corner for Aadhar based OTP authentication and for Biometric authentication contact nearest CSC centres.

How to Complete ekyc in pm kisan samman niddhi yojana ?

शासनामार्फत PM KISAN योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत हफ्ता जर आला नसेल किंवा सुरवातीला एक ते दोन हप्ते आल्यानंतर एखाद्या शेतकर्‍यांचे पुढील हप्ते आधार प्रमाणीकरणमुळे म्हणजेच PM KISAN AADHAAR E-KYC मुळे थांबले असतील, तर अश्या शेतकऱ्यांना आणि संपूर्ण नोदणी झालेल्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठीचा नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. पीएम किसान ई-केवायसी खालीलप्रमाणे करता येईल.

PM Kisan Samman Nidhi Yojana Adhar E-Kyc
  • सर्वप्रथम या वेबसाईटला भेट द्यायचं आहे.
  • त्यानंतर उजव्या बाजूस फार्मर्स कॉर्नर असा टॅब दिसेल ज्याच्या खाली ekyc नवीन ऑप्शन दिसत असेल. ekyc या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर समोरील कॅपचा कोड टाकून सबमिट वरती क्लिक करायचा आहे.
  • जर No Record Found असा error येत असेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी घाबरायचं कारण नाही कारण त्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्वीच झालेली असेल किंवा काही काळ वाट पाहून सर्व्हर अडचण दूर झाल्यानंतर प्रयत्न करू शकता.
  • पण ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच पीएम किसानसाठी ई-केवायसी झालेली नसेल तर, त्यांना मोबाईलवरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे.
  • त्यानंतर आधारवरील नाव जशास तसे टाकून आधार नंबर टाकून सब्मिट वरती क्लिक करायचा आहे.
  • पुढील काही दिवसातच तुमचे आधार प्रमाणीकरण संपूर्ण होईल आणि तुम्हाला तुमचा पुढील हप्ता येण्यास सुरुवात होईल.
See also  गावठाण जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी सुरु, प्रत्येकाला मिळणार पीआर कार्ड : Swamitva Yojana in Marathi

नोट :- ज्या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्राला ( CSC CENTER ) भेट देऊन बायोमेट्रिकच्या आधारे आपल आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा 👇👇

pm kisan samman nidhi yojana ekyc kaise kare