मृत्यु प्रमाणपत्र घरबसल्या ऑनलाइन कसे काढावे | How to apply for death certificate Online in Maharashtra

तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झालेले असेल म्हणजेच व्यक्ती मयत झालेली असेल तर मृत्यु प्रमाणपत्र ( Death Certificate ) काढणे गरजेचे असते कारण मृत्यु प्रमाणपत्र महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे मयत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन, मिळकत तसेच बँक खात्यावर असलेले पैसे वारसदारांना कायदेशीररित्या मिळवता येतात. मयत व्यक्तीच्या नावावर विमा असेल ( Insurance ) तरीसुद्धा विमा परतावा मिळविण्यासाठी मृत्यु प्रमाणपत्र खूपच महत्वाचे कार्य करते.

व्यक्तीच्या निधनानंतर विमा परतावा मिळवण्यासाठी तसेच सरकारी खाजगी कार्यालयीन कामासाठी मृत्यू प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, तर आजच्या या लेखामध्ये आपण मृत्यु प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे काढावा, मृत्यु प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज कसा करावा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

महत्वाची सूचना :- मृत्यू झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक. नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही.

मृत्यूची नोंद ऑनलाइन कशी करावी ? ( Death Certificate Online Registration )

 • सर्वप्रथम मृत्यू नोंद करण्यासाठी केंद्र शासनाच्या वेबसाईटला भेट द्या. येथे क्लिक करा
 • त्यानंतर वेबसाईटवरील General Public Signup या ऑप्शनवर क्लिक नवीन अकाउंट बनवा.
 • बनवलेल्या अकाउंटच्या आधारे लॉगिन करा
 • त्यानंतर मृत्यु नोंदणीसाठीचा फॉर्म व्यवस्थित भरा.
 • त्यामध्ये पत्त्याचा पुरावा आणि आधार कार्ड अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • फॉर्म काळजीपूर्वक भरल्यानंतर सबमिट करा.
 • फॉर्मची प्रिंटआऊट काढून जवळच्या निबंधक कार्यालयाला भेट द्या.

अशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपण मृत्यु प्रमाणपत्र सहजरित्या मिळू शकतो. काढलेल्या फॉर्मची प्रिंट आउट निबंधक कार्यालय मध्ये दाखल केल्यानंतर आपल्याला मृत्यु प्रमाणपत्र दिला जातो किंवा ऑनलाइनसुद्धा प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

मृत्यूची नोंद ऑफलाईन कशी करावी ? ( Death Certificate Offline Registration )

आपण मृत्यूची नोंद ऑनलाईन कशी करावी ती प्रक्रिया बघितली आहे पण तुम्हाला जर मृत्यूची नोंद ऑफलाइन करायची असेल तर त्यासाठी 21 दिवसाच्या आत मृत्यू झाल्यानंतर जवळच्या निबंध कार्यालयामध्ये खालील माहिती देणे आवश्यक असते.

 • मयत व्यक्तीची संपूर्ण नाव ( पुरावा )
 • मयत व्यक्तीच्या वडिलांचे नाव
 • आईचे नाव
 • मयत व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर, पतीचे किंवा पत्नीचे नाव
 • कायमचा रहिवासी पत्ता
 • मृत्यूसमयीचा राहता पत्ता
 • अर्जदाराचे नाव व संपूर्ण पत्ता
See also  महाराष्ट्र १०वी १२वी वेळापत्रक 2022 | 10th 12th Exam Timetable 2022 Maharashtra

वरील सर्व माहितीची योग्यरीत्या पुर्तता केल्यानंतर निबंधक कार्यालयामार्फत पुढील प्रक्रिया केली जाते.