शिर्डी साईबाबा मंदिर फ्री ऑनलाईन दर्शन बुकिंग | Shirdi Sai Baba Mandir Free Online Darshan Booking

महाराष्ट्रातील बहुतेक देवस्थान कोरोनाच्या वाईट काळामध्ये बंद करण्यात आले होते आणि दर्शन घेण्यासाठी भाविक-भक्तांना रांगेमध्ये उभे न करता ऑनलाइन पास दिला जात आहे ज्यामुळे मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या परिसरात गर्दी होणार नाही आणि कोरोनासारख्या महामारीला आळा बसेल हा विचार करून तिरुपती बालाजी, पंढरपूर, कोल्हापूर,तुळजापूर आणि साईबाबा शिर्डी या ठिकाणचे ऑफलाइन दर्शन घेण्यासाठीची रांग असेल किंवा पास असेल तो बंद करण्यात आलेला होता आणि सध्या स्थितीमध्ये सुद्धा बरेच ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण आजच्या या लेखामध्ये शिर्डी साईबाबाचे फ्री ऑनलाईन दर्शनपास किंवा शिर्डी साईबाबा चे ऑनलाईन बुकिंग दर्शनासाठी आपण कशा प्रकारे करू शकतो ते पाहणार आहोत.

Shirdi Sai Baba Mandir Darshan Pass Online Booking Process

  • सर्वप्रथम तुम्हाला शिर्डी साईबाबांच्या अधिकृत वेबसाईट online.sai.org.in भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन नोंदणी करावी लागेल अन्यथा आपण जर नोंदणी केलेली असेल तर लॉगिन करून Free Darshan Pass किंवा Paid Darahan Pass काढू शकता.
  • सर्वप्रथम लॉगिन केल्यानंतर आपल्याला ज्या तारखेला दर्शन हवे असेल ती तारीख निवडायची आहे, त्यानंतर दर्शनासाठीचा वेळ निवडायचा आहे.
  • त्यानंतर पुढील स्टेपमध्ये एकूण भक्त म्हणजेच दर्शन घेणारे एकूण व्यक्ती किती असतील तो क्रमांक सिलेक्ट करायचा आहे.
  • त्यानंतर व्यक्तींची संपूर्ण माहिती जसे की नाव, वय, लिंग, आधार क्रमांक इत्यादी भरून Add To Wishlist या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
  • तुम्हाला उजव्या Side ला Wishlist दिसेल यामध्ये एकूण रक्कम दाखवेल, जर तुम्ही या ठिकाणी फ्री पास काढत असाल तर तुम्हाला रक्कम दाखवली जाणार नाही, कारण फ्री पास लगेच जनरेट होतो.
  • त्यानंतर पेमेंट वरती क्लिक करून आपल्याला आपल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या साह्याने पेमेंट करायची आहे.
  • पेमेंट केल्यानंतर आपल्यासमोर Successful मेसेज येईल आणि आपला दर्शनपास आहे तयार झालेला असेल.
  • तर अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिर्डी साईबाबाचे Free आणि Paid दर्शनपास बुक करू शकता.
See also  स्वाधार योजना काय आहे ? Maharashtra Swadhar Yojana 2022 in Marathi