डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना | Dr. Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna Marathi

Dr. Punjabrao Deshmukh Vasatigruh Yojana

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी दरमहा वस्तीगृह भत्ता दिला जातो. जे विद्यार्थी शासकीय, शासनअनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतनमध्ये म्हणजेच पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी तसेच नोंदणीकृत मजुरांच्या मुलांना शहरात राहून उच्च शिक्षण घेण्यासाठीची ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत 13 ऑक्टोबर 2016 रोजी चालू करण्यात आली.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेचे फायदे ( Benefits of Dr. Panjabrao Deshmukh vastigruh Yojana )

अ ) नोंदणीकृत मजूरदार किंवा कामगार / अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी MMRDA / PMRDA / Aurangabad City / Nagpur City इत्यादी ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३०,०००/- रुपये दहा महिन्याकरता दिले जातात.

ब ) राज्यातील अन्य ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 2000 रुपये प्रतिमहा म्हणजेच २०,०००/- दहा महिन्याकरता दिले जातात.

क ) ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रचलित वा नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या निवडक व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्षातील १० महिन्याकरिता रु. ३०००/- निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो.

टीप :- सदर निर्वाहभत्ता शैक्षणिक वर्षातील सुट्टीचा कालावधी वगळून १० महिन्याकरिता दिला जातो.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह पात्रता ( Dr. Punjabrao Deshmukh vastigruh Yojana Eligibility )

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदार नोंदणीकृत कामगार किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अपत्य असावे.
  • अर्जदारांनी Technical, Professional, Non-professional, Graduation, Post-graduation इत्यादीपैकी कोणत्याही एका शैक्षणिक विभागामध्ये Admission घेतलेला असावा.
  • कुटुंबातील वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त आठ लाखापर्यंत असावे.
See also  [लिस्ट] महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी लिस्ट 2022: जिलेवार लाभार्थी सूची

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ( Documents Required For Dr. Punjabrao Deshmukh vastigruh Yojana )

  • Leaving Certificate Xerox
  • 10th 12th Marksheet
  • Bank to Aadhaar Link Receipt
  • Hostel Allowance Certificate
  • Fee Receipt
  • Income Certificate
  • गुणपत्रक
  • डोमेसाइल प्रमाणपत्र
  • गॅप प्रमाणपत्र ( जर गॅप असेल तर )
  • होस्टेलर डॉक्युमेंट्स
  • क्याप राऊंड डॉक्युमेंट्स
  • Undertaking फॉर्म ( चालू वर्षांमध्ये एकाच कुटुंबातील दोघा पेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेतलेला नाही यासाठी )
  • नोंदणीकृत कामगार प्रमाणपत्र किंवा अल्पभूधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • मागील वर्षाचे मार्क्सशीट