नवीन मतदान नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

सध्या आधार कार्डचा मोठ्या प्रमाणावर ओळखपत्र म्हणून वापर केला जातो. पण पूर्वी आधार कार्डच्या ठिकाणी मतदान कार्ड म्हणजेच Voting Card चा ओळखपत्र म्हणून वापर केला जायचा. आधार कार्ड प्रमाणेच मतदान कार्ड सुद्धा तेवढेच महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्हाला जर मतदान कार्ड नवीन नोंदणी ( Voter Card New Registration ) करायची असेल आणि नवीन मतदान कार्ड ऑनलाईन काढायचं असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन नवीन मतदान कार्डसाठी नोंदणी करू शकता. त्यासाठी मतदान कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अथवा वोटर हेल्पलाइन ( Voter Helpline Android App ) या अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी नोंदणी करू शकता त्यासंदर्भात आपल्या यूट्यूब चैनलवर व्हिडिओसुद्धा बनवण्यात आले आहेत ते तुम्ही पाहू शकता.

नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • जन्माचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
  • रहिवाशी स्वयंघोषणापत्र स्वतःच्या सहीचा ( डाऊनलोड लिंक )
  • आधारकार्ड झेरॉक्स
  • दोन पासपोर्टसाईज फोटो
  • कुटुंबातील भाऊ, बहिण, आई, वडील यापैकी कोणाचेही मतदार यादीत नाव समाविष्ट असेल तर त्यांचे मतदान कार्ड झेरॉक्स

घरातील सुनबाईचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • जन्माचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
  • रहिवाशी स्वयंघोषणापत्र ( डाऊनलोड लिंक )
  • दोन पासपोर्टसाईज फोटो
  • आधारकार्ड झेरॉक्स
  • पतीचे मतदान कार्ड ओळखपत्र झेरॉक्स
  • त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला
  • आणि जर माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
  • लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

नवीन मतदार यादीत नाव नोंदणी कशी करावी ?

सर्वप्रथम नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आपल्याला जर 18 वर्षे पूर्ण झालेली असतील तर मतदान नोंदणीसाठी दोन पद्धतीने आपल्याला मतदान यादीमध्ये नाव नोंदविता येते. एक म्हणजे ऑनलाइन पद्धतीने ज्यामध्ये Voter Helpline Android Application किंवा Voter Portal ( NVSP.IN ) या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन मतदान कार्ड साठी नोंदणी करता येते.

See also  Agriculture Loan : भूविकास बँकेची सरसकट कर्जमाफी जाहीर नवीन GR आला ! | Bhuvikas Bank Karjmafi Yojana

दुसरी मतदान कार्ड नवीन नोंदणी करण्याची पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म नंबर 6 आणि आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडून गावातील ग्रामपंचायत किंवा BLO ( Booth Level Officer ) मार्फत ठरवून दिलेल्या जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाकडे आपण सर्व कागदपत्रे देऊन नवीन मतदार नोंदणी साठी पात्र ठरू शकतो.

मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ? How to apply for voting card online ?

  • सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या ठरवून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ https://www.nvsp.in/ वरती आल्यानंतर आपल्याला Login/Register बटन दिसेल.
  • त्यावर क्लिक करून नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी मूलभूत माहिती विचारण्यात येईल ज्यामध्ये मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीने रजिस्ट्रेशन करून पुढील प्रक्रिया करायची असते.
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यामध्ये फॉर्म क्रमांक 6 सिलेक्ट करून तो काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • फॉर्म क्रमांक ६ मध्ये आपल्याला मूलभूत अशी माहिती भरावी लागते जशा प्रकारे आपले संपूर्ण नाव वडिलांचे नाव आईचे नाव जन्मतारीख आपला निवासी पत्ता इत्यादी माहिती भरल्यानंतर आपल्याला पुढील स्टेप मध्ये कागदपत्र अपलोड करावी लागतील.
  • कागदपत्रांमध्ये आपल्याला पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि जन्माचा पुरावा किंवा दाखला म्हणून आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.
  • त्यानंतर सर्व कागदपत्रे जोडून झाल्यावर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे.
  • सबमिट बटणावर क्लिक केल्यावर आपल्याला Application Reference ID भेटेल ज्याच्या मदतीने आपण आपल्या वोटर आयडी चे स्टेटस चेक करू शकतो.
  • साधारणता महिला दोन महिन्याच्या आत आपली सर्व कागदपत्रे योग्य असतील तर आपल्या पत्त्यावर मतदान ओळखपत्र BLO मार्फत पोहोचता केले जाते.

मतदान नोंदणीसाठी आणखी माहिती मिळविण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा 👇

Documents Required For New Voter ID Card Marathi