महाराष्ट्र १०वी १२वी वेळापत्रक 2022 | 10th 12th Exam Timetable 2022 Maharashtra

HSC SSC State Board Exam Timetable 2022 | HSC SSC Maharashtra Board Timetable 2022 | 10th 12th Board Exam Timetable 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत १०वी आणि १२वी ( HSC SSC 2022 TIMETABLE ) चे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त उर्वरित अभ्यासक्रमावरच विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता हिच आमची प्राथमिकता असेल असे आपल्या माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. बोर्ड परीक्षेसाठी सुरक्षित आणि योग्य असे वातावरण प्रदान करण्यासाठी यापूर्वी महाराष्ट्रातील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि वरिष्ठ शैक्षणिक विभागातील तज्ञ यांच्याशी चर्चा करून आवश्यक अशा सूचनांचे समावेश करण्याचे सांगण्यात आले.

१०वी १२वी वेळापत्रक 2022 कश्याप्रकारे असेल ?

बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक अशा प्रकारे असेल ज्यामध्ये बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान घेण्यात येतील. त्याच प्रमाणे बारावीचा निकाल जुन २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्याची शक्यता शैक्षणिक विभागामार्फत दर्शविण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे दहावीच्या लेखी बोर्ड परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान घेण्यात येतील. परीक्षा या प्रचलित पद्धतीने ( HSC SSC OFFLINE EXAM ) म्हणजेच ऑफलाइन घेतल्या जातील.

HSC Tentative Time Table 2022
SSC Tentative Timetable 2022
See also  ग्रामपंचायत संगणक परिचालकांना सानुग्रह अनुदान केव्हा मिळणार | Grampanchayat Karmachari Mandhan