महिला किसान योजना काय आहे ? | Mahila Kisan Yojana in Marathi

Mahila Kisan Yojana : महाराष्ट्र शासनामार्फत महिलांना स्वंयरोजगार मिळावा या उद्देशाने 2012 पासून महिला किसान योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे चर्मकार समाजातील महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान प्रदान करणे व सोबतच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवले होय. या लेखांमध्ये महिला किसान योजना काय आहे ? पात्रता, अटी व शर्ती, अर्ज कसा करावा ? याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Mahila Kisan Yojana information in Marathi

महिलांना शेती व्यवसायामध्ये नवनवीन उपक्रम राबविता यावेत, या अनुषंगाने शासनामार्फत महिला किसान योजना सुरू करण्यात आली. ज्यामध्ये निश्चित अर्थसहाय्य रक्कम महिलांना देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्याचा शासनाचा एक प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जात आहे.

महिला किसान योजनेच्या अटी व शर्ती

  • अर्जदार महिला चर्मकार समाजातील म्हणजेच चांभार समाजातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
  • अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत असेल.
  • अर्जदार महिलेमार्फत यापूर्वी कोणत्याही मंडळाकडून किंवा अन्य संबंधित संस्थेकडून अशा योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी 98,000 रु. व शहरी भागासाठी 1,20,000 रु. इतकी असेल.
  • कर्ज भेटल्यानंतर लाभार्थ्यांना ज्या व्यवसायाचे ज्ञान असेल त्याच व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
  • तहसीलदार किंवा त्यासमान सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला अर्जदाराकडे असावा.

संबंधित अर्जदाराने वरीलप्रमाणे अटी व शर्तीचे पालन करून कार्यालयात अर्ज केल्यास लाभार्थी महिलांना महिला किसान योजना अंतर्गत लाभ दिला जातो.

See also  मतदान ओळखपत्रांशी आधार संलग्न करण्याचे अधिकाऱ्यांमार्फत आवाहन | link voter id card with aadhar card

हे सुध्दा वाचा : राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना सुरू ! आता शेतकऱ्यांनी वार्षिक 12,000 रु. मिळणार

सूचना : फक्त अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील म्हणजेच चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी उपप्रवर्गातील महिलाच Mahila Kisan Yojana साठी अर्ज करू शकतात.

महिला किसान योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

Mahila Kisan Yojana मध्ये पात्र महिलांना एकूण 50,000 रु. रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते. ज्यामध्ये 10,000 रु. अनुदान (Subsidy) तर उर्वरित 40,000 रु. अनामत रक्कम म्हणून 5% व्याजदराने दिली जाते.

महिला किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेच्या नावाने शेती असणे आवश्यक आहे. शेती स्वतः महिलेच्या नावावर अथवा महिलेच्या पतीच्या नावावर असेल तरी महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो. पतीच्या नावे शेतजमीन असल्यास अश्या परिस्थतीमध्ये पतीचे प्रतिज्ञापत्र देणे अनिवार्य असेल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • महिला किसान योजनांतर्गत 7/12 व 8अ उतारा
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • रेशनकार्ड
  • तहसीलदारमार्फतचे जात प्रमाणपत्र
  • रहिवाशी प्रमाणपत्र

अर्ज कुठे करावा ?

Mahila Kisan Yojana साठीचा अर्ज संबंधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता दिला जातो. संबंधित अर्ज अर्जदाराने काळजीपूर्वक भरून सोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीसह जोडून कार्यालयामध्ये सादर करावा. अर्जदार कागदपत्र व अन्य अटी व शर्तीच्या अधिन बसत असेल; तर कार्यालयामार्फत पुढील प्रक्रिया करून महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

अर्जचा नमुना PDFयेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन लिंकयेथे क्लिक करा

महिला किसान योजना काय आहे ?

शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फतची महिलांसाठी एक खास योजना.

महिला किसान योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागतो ?

अर्जदाराच्या संबंधित जिल्ह्यामधील सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो.

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात ?

चर्मकार समाजाअंतर्गत येणाऱ्या चर्मकार, ढोर, होलार, मोची या प्रवर्गातील महिला अर्ज करू शकतात.