” माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” शासनाचा नवीन उपक्रम | Majha Ek Divas Majhya Balirajasathi

Majha Ek Divas Majhya Balirajasathi : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये आणखी एका उपक्रमाचा भर पडणार आहे. शासनामार्फतचा तो नवीन उपक्रम म्हणजे ” माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी “ आजच्या लेखामध्ये आपण Majha Ek Divas Majhya Balirajasathi उपक्रम नेमकं काय आहे ? शेतकऱ्यांना याचा नक्की काय फायदा होणार ? उपक्रम कधी चालू होणार ? याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात.

Majha Ek Divas Majhya Balirajasathi GR

महाराष्ट्र शासनामार्फत ” माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” Majha Ek Divas Majhya Balirajasathi अश्या प्रकारचा नवीन उपक्रम चालू करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण परिपत्रक 25 ऑगस्ट 2022 दिवशी प्रसिद्ध झालेला आहे. परिपत्रक तुम्ही लेखाच्या शेवटी डाऊनलोड करू शकता.

शेतकरी मित्रांना शेती व्यवसाय करताना विविध नैसर्गिक व अन्य संकटांना सामोरे जावे लागते. यामध्ये अतिवृष्टी, पूर व त्याचप्रमाणे वाढते कर्ज यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करतात. याच आत्महत्या टाळण्यासाठी शासनामार्फत Majha Ek Divas Majhya Balirajasathi हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा : या तारखेला येणार PM – KISAN योजनेचा पुढील 2,000 रु. चा हफ्ता. त्यापूर्वी हे काम नक्की करा.

शेतकऱ्यांसाठी केंद्रसरकार व राज्यसरकारमार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनेचा योग्य वापर करून शेतकरी अतिवृष्टी, पुर, कर्जाचा डोंगर इत्यादीपासून काही प्रमाणात समाधान मिळूवू शकतात. परंतु या ठिकाणी नेमका प्रश्न निर्माण होतो की ? काय या योजना शेतकऱ्यांना माहीत असतात ? योजनेबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना भेटते का ?

See also  Weather forecast : पंजाबराव ढख यांचा आजचा हवामान अंदाज ? थंडी वाढणार ! हरभरा, गहू पोषक वातावरण इत्यादी

Majha Ek Divas Majhya Balirajasathi initiation

गावाकडील शेतकऱ्यांना योजनेबद्दल माहिती नसल्याकारणाने किंवा कृषी अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, त्याचप्रमाणे विविध योजनेची निगडित संबंधित अधिकाऱ्यांशी योग्य तो संपर्क होत नसल्याकारणाने शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा घेता येत नाही. परिणामी शेतकरी समोर कोणताही पर्याय दिसत नसल्याकारणाने आत्महत्या करण्याकडे वळतात.

हे सुध्दा वाचा : एक राष्ट्र एक खत योजना काय आहे ? शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार का ?

शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेता यावा, त्या योजना शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित माहितीसह सांगितल्या जाव्यात, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी संबंधीत कृषी विभागाशी निगडित अधिकाऱ्यांना समजून घेता याव्यात. या अनुषंगाने ” माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी “ हा उपक्रम शासनामार्फत राबविला जाणार आहे. Scheme for Farmers Majha Ek Divas Majhya Balirajasathi

” माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” हा उपक्रम राज्यात केव्हा राबविण्यात येईल ?

‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ‘ हा महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र राज्यात 01 सप्टेंबर 2022 पासून राबविण्यात येणार असून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्यात येईल.

उपक्रमात कोणाचा सहभाग असणार ?

राज्यस्तरीय अधिकारी : कृषी आयुक्त, प्रधान सचिव, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी विद्यापीठांचे विभागीय प्रमुख इत्यादी.

विभाग स्तरावरील अधिकारी : विभागीय कृषी सहसंचालक, विभागीय आयुक्त, कृषी उपसंचालक, प्रकल्प संचालक, आत्मा गट व इतर जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा इत्यादींचा समावेश असणार.

तालुकास्तरीय अधिकारी : तहसीलदार, नायब तहसीलदार, इतर तालुकास्तरीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी इत्यादी.

लोकप्रतिनिधी : संबंधित भागातील खासदार व आमदार त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये स्वेच्छेने भाग घेऊ शकतात.

शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना ?

शेतकरी वर्गाला दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध अडचणीवर मार्गदर्शन करण्यात येणार. तसेच पीक कर्ज, कर्ज पुरवठा, पत पुरवठा, महसूल विषयक बाबी, वारस लावणे, पी.एम.किसान योजना, पीक-पाहणी, पीक प्रात्यक्षिक, आदी विषयावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना सुचविण्यात येणार.

See also  शेतकऱ्यांनो क्रेडिट कार्ड मिळेल; पण अर्ज करावा लागेल | PM Kisan Credit Card Marathi

उपक्रमात ( अभियानात ) येणाऱ्या महत्वपूर्ण बाबी

  • शेतकरी मृत झाल्यास वारसांची लवकरात नोंद कशी करावी.
  • कृषी मालास भाव मिळत नसल्यास निर्माण होणारी वीज बिल समस्या कशी सोडवावी.
  • दूध व पूरक व्यवसायासाठी पुरेसे कर्ज अनुदान कसे मिळवावे.
  • वीज संकटावर मात करण्यासाठी कृषी पंप योजनेचा लाभ कसा घ्यावा.
  • विशेष घटक योजना व बिरसा मुंडा योजनेतून सोलार योजना.
  • कर्जमाफी प्रकरणातील त्रुटी ( Land Loan Issues )
  • जलसंधारणाच्या विविध योजना
  • जंगली प्राण्यांसाठी जलयोजना
  • विविध फळझाडे लागवड मोहीम
  • आश्रमशाळेतील जेवण पद्धती
  • भुईमूग लागवड प्रक्रिया
  • कांदाचाळ अनुदान व माहिती
  • शेतीविषयक माहिती ऑनलाईन सेवा
  • बांधावर जाऊन माहिती व मार्गदर्शक मोहीम
  • शेतीविषयक बाजारभाव माहिती
  • राष्ट्रीय बँकांमध्ये कर्जभरणा माहिती ( National Banks Loan Info )
  • अन्नसुरक्षा मोहीम व औषधांचा पुरवठा
  • कर्ज प्रकरणात येणाऱ्या अडचणी व माहिती ( Loan Problems )
  • पाणी शुध्दीकरण मोहीम
  • व्यापारी वर्गाकडून पिळवणूकवर उपाययोजना
  • द्राक्ष निर्यातीसाठी शासन स्तरावरील उपाययोजना

गावा-गावात राबविणार उपक्रम

वरील नमूद विविध बाबी राबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यातील गावागावात कृषी विभागातील अधिकाऱ्यांसह अभियान किंवा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी GR डाऊनलोडयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
Majha Ek Divas Majhya Balirajasathi GR
शासनामार्फचा हा एक चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना जर विविध शासकीय योजना समजल्या व त्यांचा फायदा घेता आला, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या काही फार प्रमाणात नक्कीच कमी होतील.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम काय आहे ?

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचा विचार करून शासनामार्फत आखला गेलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम. ज्यामध्ये कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या सहवासात येऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम सुरू होईल ?