सोयाबीन टोकन यंत्र 50% अनुदानावर असा करा अर्ज | Soyabean Tokan Yantra

Soyabean Tokan Yantra : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करणे परवडण्याजोगे नसते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत 50 टक्के अनुदानावर सोयाबीन टोकन यंत्र दिलं जातं.

शेतकरी मित्रांनो, सोयाबीन टोकण यंत्र आपल्याला कसा मिळवता येतो ? सोयाबीन टोकरी यंत्रासाठी अर्ज कुठे करावा लागतो ? सोयाबीन टोकन यंत्रासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ? पात्रता काय असेल ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

सोयाबीन टोकन यंत्र

लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, जिल्हा परिषद लातूर सेस फंडातून Soyabean Tokan Yantra 50 टक्के अनुदानावर डी.बी.टी (DBT) तत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यासाठी संबंधित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या जिल्हा परिषदेमध्ये सोयाबीन टोकण यंत्रासाठी अर्ज करावा. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर आहे.

सूचना : संबंधित Soyabean Tokan Yantra साठी अर्ज लातूर जिल्ह्यासाठी आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये या यंत्रासाठी अर्ज सुरू झाले आहेत की नाही ? यासाठी संबंधित पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये चौकशी करावी.

Soyabean Tokan Yantra पात्रता

  • अर्जदार संबंधित जिल्ह्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदार अनु.जाती, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील असावा.
  • अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्र असावीत.

सोयाबीन टोकण यंत्रासाठी लागणारी कागदपत्रे

  • शेतजमिनीचा 7/12 उतारा
  • शेतजमिनीचा 8 अ उतारा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • लाभार्थी जात प्रवर्गातून असल्यास ( जातीचे प्रमाणपत्र )
  • अर्जदार दिव्यांग असल्यास ( अपंगत्वाचा दाखला )

Soyabean Tokan Yantra साठी अर्ज कसा करावा ?

सोयाबीन टोकन यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी वरील नमून सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून घ्याव्यात. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद / पंचायत समिती या ठिकाणी संबंधित कागदपत्रे व अर्जाचा नमुना दाखल करावा.

See also  Recurring Deposit : पोस्ट ऑफिसात फक्त 100 रु. गुंतवा आणि लाखात परतावा मिळवा, नवीन योजना

अर्ज दाखल केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड झाल्यास पुढील एक महिन्यात लाभार्थ्यांनी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीने सोयाबीन टोकन यंत्र खरेदी करून त्याबद्दलची सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.

सोयाबीन टोकन यंत्राचे फायदे

  • अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन टोकन यंत्र खूपच उपयोगाचे आहे.
  • कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्राचा चांगलाच फायदा होतो.
  • बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करते वेळेस सोयाबीन टोकण यंत्र महत्त्वाची भूमिका बजावतो.

सोयाबीन टोकन यंत्र अनुदान

खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम संस्थांनी तपासणी व परीक्षण करून BSI अथवा संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार / तांत्रिक निकषानुसार असावीत. अशा प्रकारच्या यंत्रणा 50 टक्केपर्यंत अनुदान देण्यात येईल. ज्याची कमाल मर्यादा 10,000 रुपयापर्येंत असते, म्हणजेच साधारणतः सोयाबीन टोकन यंत्र बाजारामध्ये ७ हजारांपासून ९ हजारपर्येंत उपलब्ध होतो. या रकमेच्या ५० टक्के म्हणजेच जवळपास शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्रासाठी ३५०० रु ते ४५०० रु अनुदान देण्यात येतं.

हे सुध्दा वाचा : शेततळे अनुदान योजना पुन्हा सुरु, 75 हजारापर्यंत अनुदान मिळणार !

सूचना : सोयाबीन टोकन यंत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यास, लक्षांकानुसार सोडत पद्धतीने संबंधित पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांना टोकन यंत्र अनुदान त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर हस्तांतरित ( Bank Transfer ) करण्यात येईल.

सोयाबीन टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का ?

हो, कारण सोयाबीन टोकन यंत्र Mahadbt पोर्टलच्या माध्यमातूनसुध्दा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला Mahadbtmahait farmer च्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येतो.

सोयाबीन टोकन यंत्रासाठी किती अनुदान दिलं जात ?

सोयाबीन टोकन यंत्रासाठी ५०% टक्के अनुदान देण्यात येत, ज्याची कमाल मर्यादा १०,००० रुपयापर्येंत आहे.

टोकन यंत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?

टोकन यंत्रासाठी ७/१२ उतारा, ८अ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्ज करतांना लागतात.