CBIC : सीमाशुल्क विभागात 8वी, 10वी पाससाठी भरती

CBIC Recruitment 2022 सीमा शुल्क विभाग, जामनगर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CBIC च्या अधिकृत वेबसाइट jamnagarcustoms.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण आगा : २७

रिक्त पदांचा तपशील :
१) टिंडेल
२) सुखानी
३) इंजिन ड्रायव्हर
४) लॉन्च मेकॅनिक
५) ट्रेडसमन
६) सीमन

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 8वी, 10वी उत्तीर्ण असावा. तसेच आयटीआय प्रमाणपत्र असावे. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
पगार : उमेदवारांना स्तर 4 7व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार 25500 ते 81100 रुपये पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड चाचणी, मुलाखत आणि शॉर्टलिस्टच्या आधारे केली जाईल.
इतर माहिती :
उमेदवारांनी रीतसर भरलेला अर्ज अतिरिक्त आयुक्त (P&V), कस्टम्स आयुक्तालय (प्रतिबंधक) जामनगर-राजकोट महामार्ग, व्हिक्टोरिया पुलाजवळ, जामनगर – 361001, (गुजरात) यांना पाठवावा लागेल.

अधिकृत संकेतस्थळ : jamnagarcustoms.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल