चालू घडामोडी : ११ मे २०२१

तिसर्‍या आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठकीत भारत सहभागीभूविज्ञान मंत्रालय तिसर्‍या आर्क्टिक विज्ञानमंत्री स्तरीय बैठकीत भारत सहभागी;  आर्क्टिक क्षेत्रात संशोधन आणि दीर्घकालीन ...

आर्क्टिक क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक व्यासपीठ असलेल्या आर्क्टिक परिषदेची तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक 8 मे आणि 9 मे 2021 रोजी पार पडली.

या बैठकीय भारताच्यावतीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य व कुटुंब कल्याण, आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आर्क्टिक क्षेत्रात संशोधन, कार्य आणि सहकार्यासाठी भारताची दृष्टी आणि दीर्घकालीन योजना हितधारकांसोबत सामायिक केल्या.

आर्क्टिकमध्ये निरिक्षण यंत्रणेत अव्याहत आणि रिमोट सेन्सिंगद्वारे योगदान देण्याची आपली योजना भारताने सामायिक केली. त्यासाठी अमेरिकेच्या सहकार्याने NISER (NASA-ISRO सिंथेटिक अपेर्चर रडार) उपग्रह अभियानाचे प्रक्षेपण होणार आहे.

ठळक बाबी

– तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय (ASM 3) ही आशिया खंडातील पहिली मंत्रीस्तरीय बैठक आहे.
– आइसलँड आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित केली होती.
– ‘शाश्वत आर्क्टिकसाठी ज्ञान’ (Knowledge for a Sustainable Arctic) ही ASM 3 बैठकीची संकल्पना होती.
– आर्क्टिक क्षेत्राविषयी सामूहिक समज वाढविण्यासाठी, निरंतर देखरेखीवर भर देण्यासाठी आणि निरिक्षणांना बळकटी देण्यासाठी विविध हितधारकांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून ही बैठक आयोजित केली गेली.
– आर्क्टिक परिषदेच्या पहिल्या दोन बैठका अनुक्रमे 2016 साली अमेरिकेत आणि 2018 साली जर्मनी येथे झाल्या.

आर्क्टिक परिषद

– आर्क्टिक परिषद हा शाश्वत विकास आणि आर्क्टिकमधील पर्यावरणीय संरक्षणाकडे सहकार्य, समन्वय आणि संवाद वाढविण्यासाठी एक उच्चस्तरीय आंतर-सरकारी मंच आहे.

– परिषदेची स्थापना 19 सप्टेंबर 1996 रोजी झाली.
– आर्क्टिक क्षेत्रावर सार्वभौमत्व असणारे आठ देश या परिषदेचे सदस्य आहेत; ते पुढीलप्रमाणे आहेत – कॅनडा, डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड, नॉर्वे, रशिया, स्वीडन आणि अमेरिका. इतर देश ‘निरीक्षक’ म्हणून आहेत.
– 2013 सालापासून आर्क्टिक परिषदेत इतर बारा देशांसह भारताला ‘निरीक्षक’ दर्जा प्राप्त आहे.

See also  चालू घडामोडी : १९ जुलै २०२१

भारतात आढळला कोरोनाच्या B.1.617 प्रकारचा विषाणूCovid rep 1

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात आढळून आलेल्या करोनाच्या B.1.617 प्रकारचा विषाणू जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.
भारतात आढळून आलेल्या B.1.617 या विषाणूवर सुरूवातीला लक्ष ठेवण्यात आले होते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड -१९ टेक्निकल लीडच्या डॉ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले.
या विषाणूमुळे भारतातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय असल्याचे म्हंटले आहे.
“काही प्राथमिक अभ्यासानुसार या स्ट्रेनच्या विषाणूमुळे रुग्णवाढ झाली असली तरी, आम्हाला या विषाणूच्या प्रकाराविषयी अधिक माहिती हवी आहे, म्हणून आम्ही अधिक माहिती गोळा करत आहोत, तसेच भारत आणि इतर ठिकाणांहून अधिक नमुने मिळवण्याची गरज आहे जेणेकरुन हा विषाणू किती पसरला आहे याची माहिती मिळू शकेल”, असे व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या.