चालू घडामोडी : १७ मे २०२१

तौकते चक्रीवादळ

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेले तौकते चक्रीवादळ 16 मे 2021 रोजी अधिक तीव्र झाले. वेधशाळेने या वादळाने ‘व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचे जाहीर केले आहे.

तौकते चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला समांतर गुजरातकडे वाहत जाणार आहे. 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.

cyclone

म्यानमार देशाने अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या ‘तौकते’ नामक उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचे नामकरण केले आहे.

निसर्गचक्र चालताना ऋतुत बदल होत असताना वारे बदल होतात. हे वारे कधी कधी अगदी विध्वंसकही होतात, त्यांना चक्रीवादळे असे म्हणतात. वादळांचे एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.

लिस्टर सिटीला जेतेपदkrida 1 5

लिस्टर सिटीने बलाढय़ चेल्सीचा १-० असा पराभव करत एफए चषकावर नाव कोरले.
लिस्टर सिटीने क्लबच्या १३७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एफए चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली.
यौरी टिलेमान्स याने ६३व्या मिनिटाला केलेला गोल स्पर्धेच्या १४९ वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरला.
टिलेमान्सने ३० मीटरवरून मारलेला फटका थेट गोलजाळ्यात गेला. याआधी लिस्टर सिटीला चार वेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
१९६९मध्ये त्यांनी अखेरच्या वेळी एफए चषकाची अंतिम फेरी गाठली होती.
थॉमस टकेल यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या चेल्सीने पहिल्या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.

तेजस्विनने यूएसमध्ये जिंकले सुवर्णपदक

भारतीय उंच उडीपटू तेजस्विन शंकरने अमेरिकेतील मॅनहट्टनमध्ये बिग १२ आउटडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
कॅनसस राज्य विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना तेजस्विनने शनिवारी २.२८ मीटर उडी घेत ही कामगिरी साधली. त्याचे चालू सत्रातील वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी ठरली.
त्याने यापूर्वी २०१८ मध्ये २.२९ मीटर उडी घेत राष्ट्रीय विक्रम बनवला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमाच्या वार्नोन टर्नरने (२.२५ मी.) रौप्य व टेक्सास टेक युनिव्हर्सिटीच्या जेक्वान होगनने (२.११ मी.) कांस्यपदक जिंकले. तेजस्विनचे हे स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक ठरले.

See also  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 11 मार्च 2022