चालू घडामोडी : २८ मे २०२१

व्हिलारेयालला जेतेपदk 4 10

व्हिलारेयालने पेनल्टी-शूटआउटमध्ये मँचेस्टर युनायटेडचा ११-१० असा पराभव करत युरोपा लीग फुटबॉलचे जेतेपद पटकावले.
निर्धारित वेळेत गेरार्ड मोरेनो याने २९व्या मिनिटाला व्हिलारेयालसाठी पहिला गोल केला. त्यानंतर एडिन्सन कावानीने ५५व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधून दिला.
नंतर अतिरिक्त वेळेतही १-१ अशा बरोबरीची कोंडी न फुटल्याने पेनल्टी शूटआउटमध्ये अखेरच्या खेळाडूलाही गोल झळकावण्याची संधी मिळाली. दोन्ही संघांतील प्रत्येकी १० खेळाडूंनी
व्हिलारेयालने युरोपियन फुटबॉलमधील बलाढय़ मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का देत ९८ वर्षांच्या क्लबच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रतिष्ठेचे जेतेपद संपादन केले.
व्हिलारेयालने या जेतेपदासह पुढील मोसमासाठी चॅम्पियन्स लीगचे स्थानही निश्चित केले.
व्हिलारेयालचे प्रशिक्षक यूनाय इमेरी यांचे हे युरोपा लीगचे चौथे जेतेपद ठरले.
याआधी त्यांनी सेव्हियाला २०१४ ते २०१६ दरम्यान तीन जेतेपदे मिळवून दिली होती.
१९८०नंतर मँचेस्टर युनायटेडला प्रथमच सलग चौथ्या मोसमात एकही जेतेपद मिळवता आले नाही.
यंदाच्या मोसमात त्यांना इंग्लिश प्रीमियर लीगमध्येही दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

साहित्य-संस्कृती मंडळाच्याअध्यक्षपदी सदानंद मोरे

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय २९ सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली.

भारताच्या शेऊलीला रौप्यपदकk 4 8

भारताचा वेटलिफ्टिंगपटू अचिंता शेऊलीने बुधवारी कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
१९ वर्षीय शेऊलीने ७३ किलो वजनी गटात एकूण ३१३ किलो (स्नॅच १४१, क्लीन अँड जर्क १७२) वजन उचलले. इंडोनेशियाच्या जुनियान रिझकीने (३४९ किलो) सुवर्णपदक जिंकले, तर रशियाच्या सेरोबिन गेव्होर्गने (३०८) कांस्यपदक मिळवले.
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या शेऊलीने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई स्पर्धेत त्याने स्नॅचमध्ये १३९, तर क्लीन अँड जर्कमध्ये १७० किलो वजन उचलले होते. यावेळी त्याने त्या कामगिरीला मागे टाकले.
जागतिक स्पर्धेत स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारासाठी वैयक्तिक वेगळे पदक देण्यात येते. ऑलिम्पिकमध्ये मात्र दोन्ही प्रकाराचे मिळून एकच पदक विजेत्याला दिले जाते. मंगळवारी ६७ किलो वजनी गटात भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने स्नॅच प्रकारात कांस्यपदक जिंकले.

कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या MCA21च्या तिसऱ्या आवृत्तीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

24 मे 2021 रोजी झालेल्या एका आभासी कार्यक्रमात केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट कार्य राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते MCA अर्थात कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या MCA21 या नव्या मंचाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या (V3.0) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.

MCA21 मध्ये सुधारित रचनेचे संकेतस्थळ, MCA च्या अधिकाऱ्यांसाठी नव्या ईमेल सुविधा तसेच ई-पुस्तक आणि ई-सल्लागार सेवा या दोन नव्या रचनांचा समावेश आहे. ई-सल्लागार सेवा खाली नमूद सोयी उपलब्ध करून देईल –

MCA कडून वेळोवेळी प्रस्तावित करण्यात आलेल्या दुरुस्त्या आणि नवी विधेयके यांच्याबद्दल आभासी पद्धतीने नागरिकांना सल्ला सेवा पुरविणे.
धोरणविषयक निर्णय जलद घेता यावे यासाठी भागधारकांकडून आलेल्या सूचना किंवा टीका यांचे संकलन, वर्गीकरण आणि श्रेणीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेणे.
MCA च्या अधिकाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली नवी ईमेल सुविधा त्यांना अंतर्गत तसेच बाह्य भागधारकांशी सुव्यवस्थित आणि सुव्यवस्थापित संपर्कासाठी अधिक उत्तम वैशिष्ट्ये आणि क्षमता बहाल करेल.

MCA21 विषयी

MCA21 हा भारत सरकारच्या मोहीम प्रकाराच्या प्रकल्पांचा एक भाग आहे. भूतकाळात अनेक प्रशंसा मिळवल्यानंतर, या प्रकल्पाने आता तिसऱ्या आवृत्तीपर्यंत मजल गाठली आहे. MCA21 V3.0 हा या वर्षीच्या अर्थसंकल्पीय घोषणेचा भाग आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून कॉर्पोरेट अनुपालन आणि भागीदार अनुभव अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावरून झिदान पायउतारk 5 6

झिनेदिन झिदान यांनी पुन्हा एकदा रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. रेयाल माद्रिदला दशकात पहिल्यांदाच ला-लीगाचे जेतेपद मिळवून देण्यात असमर्थ ठरल्यामुळे झिदान यांनी हा निर्णय घेतला.
‘‘झिदान यांचा करार जून २०२२पर्यंत असला तरी त्यांनी रेयाल माद्रिदचे प्रशिक्षकपद सोडण्याचे ठरवले आहे. त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर राखतो. त्यांची व्यावसायिकता, खेळाप्रतिची आवड आणि समर्पण वृत्तीला आमचा सलाम,’’ असे रेयाल माद्रिद क्लबकडून सांगण्यात आले.
२०१६ ते २०१८दरम्यान पहिल्यांदा रेयाल माद्रिदचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या झिदान यांनी सलग तीन वेळा चॅम्पियन्स लीगची जेतेपदे मिळवून दिली. मात्र मार्च २०१९मध्ये पुन्हा एकदा रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारणाऱ्या झिदान यांना क्लबला फारसे यश मिळवून देता आले नाही.

See also  ESIS : कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय औरंगाबाद येथे भरती ; पगार 60,000