Current Affairs : चालू घडामोडी 09 फेब्रुवारी 2022

Daily Current Affairs 09 February 2022

Asia’s Richest Person: गौतम अदानी ठरले जागतील सर्वात वेगाने संपत्ती वाढणारे कोट्याधीश

image 1

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील चुरस दिसून येत आहे.

बंदरे, विमानतळं, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी ८८.५ बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटलंय. याचवेळी अंबानींची एकून संपत्ती ही ८७.९ बिलीयन डॉलर्स इतकी आहे.

आफ्रिका चषक फुटबॉल स्पर्धा : सेनेगलची अजिंक्यपदाची प्रतीक्षा संपली

तारांकित खेळाडू सादिओ मानेने पेनल्टी शूटआऊटमध्ये केलेल्या निर्णायक गोलमुळे सेनेगलने इजिप्तला पराभूत करत पहिल्यांदा आफ्रिका चषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. ९० मिनिटांचा नियमित वेळ आणि ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळानंतर सामन्यात गोलशून्य बरोबरी असल्याने विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात आला. यात सेनेगलने ४-२ अशी बाजी मारून ऐतिहासिक अजिंक्यपदावर कब्जा केला.

ओवैसींनी झेड श्रेणीची सुरक्षा स्वीकारावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. पण या सुरक्षेचा नक्की अर्थ काय?

ओवैसींनी झेड श्रेणीची सुरक्षा स्वीकारावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. पण या सुरक्षेचा नक्की अर्थ काय?

See also  MPSC परीक्षेत जळगावच्या तरुणाची बाजी ; राज्यात मिळविला पहिला क्रमांक..

Z Security म्हणजे काय?
कोणाला सुरक्षा पुरवली जाते?

प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो.
एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.

सामान्यपणे महत्वाच्या व्यक्तींनाही सुरक्षा पुरवण्याआधी केंद्र सरकार अनेक गोष्टींचा विचार करते आणि त्यानंतरच सुरक्षा पुरवते. राज्यातील पोलिसांबरोबरच इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने ही सुरक्षा महत्वाच्या व्यक्तींना पुरवली जाते.

कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवली जावी हे कसं ठरतं?
एखाद्या व्यक्तीला कोणत्याप्रकारची सुरक्षा पुरवली जावी याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेतं. मात्र हा निर्णय घेताना गुप्तचर यंत्रणांकडून म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच ‘आयबी’ आणि रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’चा सल्ला घेतला जातो.

पैसे कोण भरतं?

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा केंद्र सरकार एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवते तेव्हा ती मोफत पुरवली जाते. मात्र ज्यांना झेड किंवा झेड प्लससारखी जास्त सुरक्षा पुरवली जाते आणि ही सुरक्षा त्या व्यक्तींच्या राहत्या घराभोवती किंवा प्रवासादरम्यानही पुरवली जात असेल तर सुरक्षा यंत्रणेतील व्यक्तींच्या राहण्याची सोय या व्यक्तींनाच करावी लागते.

ही सुरक्षा मोफत पुरवली जात असली तरी सरकार काही व्यक्तींना धमक्यांच्या आधारे सुरक्षा पुरवण्यात आली तरी पेड सिक्युरीटी म्हणजेच सुरक्षेच्या मोबदल्यात पैसे घेण्यात निर्णय घेऊ शकते. आयबीने २०१३ साली उद्योजक मुकेश अंबानी यांना मिळालेल्या धमकीच्या आधारे त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही सुरक्षा देताना सरकारने अंबानींकडून महिन्याला १५ लाख रुपये फी घेण्याची सुचना केली होती.

Model school Initiative

मॉडेल स्कूल उपक्रमामध्ये केवळ भौतिक सुविधा वाढविणे ही अपेक्षा नसून शाळांची गुणवत्ता वाढ व्हावी, हा उद्देश असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

कारंदवाडी (ता.वाळवा) येथे मंत्री पाटील यांच्या हस्ते १ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.
जिल्ह्यातील १४१ शाळा पहिल्या टप्प्यात मॉडेल स्कूल उपक्रमात सहभागी करण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी तेवढय़ाच शाळांचा समावेश करण्यात येईल. शाळेची गुणवत्ता वाढ व्हावी ही अपेक्षा यामागे आहे

See also  SSEZA सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरण, मुंबई येथे आठवी उत्तीर्णांना संधी ; पगार ५,२०० ते २०,२००

अहमदाबाद संघाचं नाव ठरलं

Ahmedabad IPL team players 2022: Hardik Pandya picked as Ahmedabad captain  for IPL 2022; Shubman Gill also roped in - The SportsRush

आयपीएल 2022च्या तयारीला सुरुवात झाली आहे.
आयपीएलच्या या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.
अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे. हा संघ आता अहमदाबाद टायटन्स नावाने ओळखला जाईल.
तर अहमदाबादपूर्वी लखनऊ फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली. लखनऊ संघाने नाव लखनऊ सुपरजायंट्स असे आहे.
केएल राहुल लखनऊ संघाचा कप्तान आहे, तर हार्दिक पंड्या अहमदाबाद संघांचे नेतृत्व करणार आहे.

नितीन गडकरी यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार

iRASTE: Nitin Gadkari launches AI-powered road safety project that aims to  reduce accidents by 50% - Cities News

नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा 2020-21- वर्षासाठीचा कार्यक्षम खासदार पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे.
10 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता नवी दिल्लीतील निवासस्थानी गडकरी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदारांना दिला जात होता.
तर आता या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षाआड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत.
रुपये 50 हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हे देखील वाचा :

  • AIIMS मध्ये 254 जागांसाठी भरती, 12वी ते पदवीधर अर्ज करू शकतात
  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे येथे 37 जागांसाठी भरती
  • MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 डिसेंबर 2022
  • मुंबईत महारोजगार मेळाव्यात ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी
  •  SBI : भारतीय स्टेट बँक मुंबई येथे विविध पदांची भरती