Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात ३२२ पदांसाठी नवीन भरती, 10वी, 12वी पाससाठी संधी

भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या एकूण ३२२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच ४ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक उमेदवारांनी joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : ३२२

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) नाविक (जनरल ड्युटी): २६० पदे
२) नाविक (घरगुती शाखा): ३५  पदे
३) मेकॅनिकल: २७ पदे

शैक्षणिक पात्रता आणि वयो मर्यादा :
नाविक (सामान्य कर्तव्य): गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2. या पदासाठी उमेदवाराचा जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

नाविक (घरगुती शाखा):  मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

मेकॅनिकल: उमेदवाराकडे 10 वी पास आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असावा. या पदासाठी उमेदवाराचा जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

शारीरिक चाचणी

उंची: 157 सेमी
शर्यत: 7 मिनिटांत 1.6 किमी
सिट-अप्स: 20
पुश-अप्स: 10

निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल.

अर्ज शुल्क
या पदांसाठी, UR, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना ₹ 250 अर्ज शुल्क जमा करावे लागेल. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

पगार :

– नाविक (जनरल ड्युटी) : रु 21,700/- (पे स्तर-3)
– नाविक (घरगुती शाखा) : रु 21,700/- (वेतन स्तर-3)
– मेकॅनिकल : रु 29200/-+ 62,00/- अधिक महागाई भत्ता

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 04 जानेवारी 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiancoastguard.gov.in

See also  NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदांची भरती, असा करा अर्ज

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा