MPSC मार्फत सन 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी २०२२ या वर्षामध्ये होणार्‍या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यसेवा, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तसेच गट क संयुक्त पूर्व परीक्ष याचसोबत महाराष्ट्र तांत्रिकसेवा पूर्व परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, व न्याय दंडाधिकारी परीक्षा २०२२ मध्ये दोन वेळा होणार आहेत.

विभागीय पीएसआय आणि सहायक मोटार वाहक निरीक्षक या परीक्षा एक वेळा होणार आहे.

MPSC 2022 Tentative Schedule

Download : PDF 2022 MPSC Timetable

टीप :- (१) शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.

(२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

(३) अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

(४) संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.

(५) संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

See also  विद्यार्थ्यांना दिलासा : MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत वाढ