MPSC मार्फत विविध संवर्गातील १५ हजार रिक्त पदे भरली जाणार

सन २०१८ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १५ हजार ५११ पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीचा कारभार गतिमान करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलैपर्यंत भरण्यात येणार असल्याचे सोमवारी सांगितले होते.

त्यानंतर मंगळवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल जलद गतीने पूर्ण करण्यासाठी उपाय योजनांबाबतचे ठोस निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आले असल्याचे सांगितले.

ज्या विभागांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे अशा विभागांना रिक्त पदे भरण्याची मान्यता वित्त विभागाने दिली आहे. त्यामुळे आता सन २०१८ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही रिक्त पदे भरताना पदांचे आरक्षण तपासून ती पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही पवार यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

एमपीएससीमार्फत भरली जाणारी रिक्त पदे
अ गट४,४१७
ब गट ८,०३१
क गट३,०६३
एकूण१५,५११

See also  मराठी मुलीची अमेरिकन शेअर बाजारात बाजी, नेहा नारखेडे झाली अब्जाधीश