मुंबई अग्निशमन दलातील 910 जागांसाठी लवकरच भरती

mumbai Fire Department Bharti 2022 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आणखी एक संधी मिळणार आहे. ती म्हणजे गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. २०१७ मध्ये यापूर्वी भरती झाली होती, तशीच भरती आता होणार आहे.

अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठी भरती होणार असून लवकरच त्याकरिता जाहिरातही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना पोलीस भरतीप्रमाणे वयाची अट दोन वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. 

बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणींचा या प्रक्रियेत समावेश आहे. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे. त्याकरिता अग्निशमन दलाने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत.

काही सुरु होणार भरतीप्रक्रिया?
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर डिसेंबरअखेपर्यंत प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया, वैद्यकीय चाचणी याकरिता दोन महिने लागतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे प्रशिक्षण अशा प्रक्रिया पार पाडून सगळे सुरळीत झाले तरी उमेदवारांना प्रत्यक्ष रुजू होण्यासाठी एक वर्ष जाईल, असे अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी सांगितले.

वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली
टाळेबंदीमुळे पोलीस भरतीमध्ये जशी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली तशीच सवलत या भरतीतही देण्यात येणार असून त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

त्यामुळे आता खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २७ वर्षे असेल तर आरक्षणासाठी हीच मर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षे असेल. तसेच सातत्याने रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी करता येईल का याबाबतही विचार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

See also  तरुणांनो तयारीला लागा : SSC करणार सरकारच्या विविध खात्यात 73,333 पदांची मेगाभरती