PNB पंजाब नॅशनल बँक पुणे येथे शिपाई & सफाई कामगार पदांच्या ६० जागा

दहावी आणि बारावी उत्तीर्णांसाठी एक संधी चालून आली आहे. पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र (Punjab National Bank) पुणे येथे एकूण ६० पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PNB Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Bank Jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२२ असणार आहे.

एकूण जागा : ६०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) शिपाई/ Peon – १९ पदे
शैक्षणिक पात्रता :
०१) केवळ १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक).

२) सफाई कामगार/ Sweepers – ४१ पदे
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयो मर्यादा :

०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

निवड प्रक्रिया :

शिपाई पदासाठी निवड ही त्या उमेदवाराने १०वी इयत्तेत (वेटेज ४०%) आणि १२ वी इयत्तेत (वेटेज ६०%) किती टक्के गुण मिळवले आहेत त्या आधारे करण्यात येईल. गुणांची टक्केवारी करताना दोन दशांशापर्यंत गणना करण्यात येईल. वर दिलेल्या गणनेनुसार ज्या उमेदवारांना जास्त टक्के मिळाले असतील त्यांचा गुणवत्ता यादीत कमी टक्के असलेल्या उमेदवारांच्या वर क्रमांक लागेल.

इतका मिळेल पगार :

१) शिपाई : वेतन १४,५००/- दरमहा अधिक दैनदिन भत्ता, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता व विशेष भत्ता

२) सफाई कामगार : ४८३३

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ फेब्रुवारी २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास विभाग, पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय ९, मोलेदिना रोड, आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे – ४११००१.

See also  Police Bharti Syllabus 2022 : महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in

जाहिरात – शिपाई (Notification) : येथे क्लीक करा

जाहिरात – सफाई कर्मचारी (Notification) : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

  •  SBI : भारतीय स्टेट बँक मुंबई येथे विविध पदांची भरती
  • कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली येथे मोठी भरती, 7वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स..
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विनापरीक्षा थेट भरती, 30000 पगार मिळेल
  • AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 596 जागा
  • IAF : भारतीय हवाई दल नाशिक येथे भरती, 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी..