गट- क मधील लिपिकवर्गीय पदे MPSC मार्फत भरण्यात येणार

MPSC विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहे. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी, यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ही मागणी करण्यात येत होती. यासाठी 10 ऑक्टोबर 2020 रोजी सामान्य प्रशासन विभाग आणि MPSC यांच्यात संयुक्त बैठक पार पडली होती, या बैठकीत प्रायोगिक तत्वावर राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा MPSC द्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे याला अंतिम मान्यता मिळण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी गेला. आणि आज 2 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध होऊन एक महत्वाचा निर्णय झाला, नजीकच्या काळात सर्व परीक्षा या MPSC च्या कक्षेत येतील. सुरवातीपासून विविध माध्यमातून 2019 पासून केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदांची (गट अ ते गट क) पदभरती MPSC द्वारे करण्यात यावी यासाठी विद्यार्थी पाठपुरावा करत होते. यातील एक टप्पा आजच्या निर्णयाने यशस्वी झाला आहे.

लिपिक पदे MPSC द्वारे भरण्यात यावी यासाठी दत्तात्रय मामा भरणे (माजी राज्यमंत्री,सा. प्र.वि) यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑक्टोबर 2020 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेतला होता, या निर्णयामुळे हा विषय पुढे मार्गी लागण्यास मदत झाली. तसेच बच्चू कडू व रोहित पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. यामुळे 2020 मध्ये ही बैठक घेतली जाऊन निर्णय घेतला गेला होता. पण त्याला पुढे शासकीय मान्यता मिळण्यासाठी मध्ये तांत्रिक गोष्टी पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागली. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी व उमेदवारांची मागणी लक्षात घेता राज्यमंत्री मंडळ बैठकी मध्ये निर्णय घेऊन आज त्याला शासकीय अंतिम मान्यता मिळून दिली.

See also  SBI सह ‘या’ सरकारी बँकांमध्ये बंपर रिक्त जागा, जाणून संपूर्ण तपशील