पुणे पोलीस विभागांतर्गत 795 जागांसाठी भरती

Pune Police Recruitment 2022 : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई आणि चालक पदांच्या एकूण 795 जागांसाठीची जाहिरात (Pune Police Bharti 2022) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 9 नोव्हेंबर आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. Police Bharti

एकूण पदसंख्या : 795
यामध्ये पोलीस शिपाई पदांच्या ७२० जागा आहेत, तसेच चालक(ड्रायव्हर)पदाच्या ७५ जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार इयत्ता 12 वी किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत

२) पोलीस शिपाई चालक

वयोमर्यादा :
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-

निवड पद्धती:
शारीरिक चाचणी,
लेखी परीक्षा,
चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
वैद्यकीय चाचणी इ.

अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – http://punepolice.gov.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पोलीस शिपाई : येथे क्लीक करा
पोलीस शिपाई चालक : येथे क्लीक करा

See also  वैदिक संशोधन मंडळ पुणे येथे विविध पदांची भरती ; पगार 39 हजारापर्यंत