रेल्वेत 10वी उत्तीर्णांसाठी 756 रिक्त जागा, परीक्षा न घेताच होणार निवड

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. रे भारतीय रेल्वेने ईस्ट कोस्ट रेल्वे (Railway Recruitment 2022) मध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी (Railway Bharti 2022) 7 मार्च 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट rrcbbs.org.in वर जाऊन अर्ज करू शकतात. एकूण 756 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

एकूण जागा : ७५६

पदाचे नाव : अप्रेंटिस 

विभागीय पदे :

1) गाडी दुरुस्ती कार्यशाळा, मंचेश्वर, भुवनेश्वर 190
2) खुर्द रोड विभाग 237
3 )वॉलटेर विभाग 263
4) संबलपूर विभाग 66

शैक्षणिक पात्रता :

10वी पास असलेले ITI प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा :

उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि वयाची 24 वर्षे पूर्ण झालेली नसावी.
उच्च वयोमर्यादा SC/ST उमेदवारांच्या बाबतीत 05 वर्षे, OBC उमेदवारांच्या बाबतीत 3 वर्षे शिथिल आहे.
अपंग व्यक्तींसाठी, उच्च वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे.

निवड प्रक्रिया
10वी आणि ITI प्रमाणपत्राच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज फी :

पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज फी म्हणून ₹ 100 जमा करावे लागतील.

अधिकृत संकेतस्थळ : rrcbbs.org.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

  • कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली येथे मोठी भरती, 7वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स..
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विनापरीक्षा थेट भरती, 30000 पगार मिळेल
  • AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 596 जागा
  • IAF : भारतीय हवाई दल नाशिक येथे भरती, 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी..
  • हमालाच्या मुलीनं MPSC परीक्षेत मिळविलं मोठं यश ; राज्यात आली पहिली
See also  PMC : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी नवीन भरती