राज्यसभा सचिवालयात 100 पदे रिक्त, परीक्षा न घेता होणार निवड

Rajya Sabha Secretariat Recruitment 2022 : राज्यसभा सचिवालयमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी राज्यसभा सचिवालयाने रिक्त विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते राज्यसभा सचिवालयाच्या अधिकृत वेबसाइट rajyasabha.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 100 पदे भरली जातील.

एकूण जागा : १००

पदांची नावे आणि पदसंख्या :

१) विधान/समिती/कार्यकारी/प्रोटोकॉल अधिकारी: १२ पदे
२) सहाय्यक विधान/समिती/कार्यकारी/प्रोटोकॉल अधिकारी: २६ पदे
३) सचिवालय सहाय्यक: 27 पदे
४) सहाय्यक संशोधन/संदर्भ अधिकारी: ३ पदे
५) अनुवादक: 15 पोस्ट
६) वैयक्तिक सहाय्यक: 15 पदे
७) ऑफिस वर्क असिस्टंट: १२ पदे

शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असली पाहिजे.

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा ५६ वर्षे असावी.

महत्वाची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल (जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत)

अधिकृत संकेतस्थळ : https://rajyasabha.nic.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.पुणे येथे ४७ जागांसाठी भरती