महसूल व वन विभागात विविध पदांची भरती, पगार ३०,०००

महसूल आणि वन विभागमध्ये एकूण ०३ जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे. मुलाखत दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी आहे.

एकूण जागा : ०३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पर्यावरण तज्ञ/ Environmental Expert ०१
शैक्षणिक पात्रता :
U.G.C. मान्यता प्राप्त विद्यापिठाची वनशास्त्र/ प्राणीशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ पर्यावरण शास्त्र पदव्युत्तर पदवीधारक असावा, निसर्ग विषयक सखोल माहिती असावी/ संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे. सदर क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.

२) जी.आय.एस. तज्ञ/ GIS Expert ०१
शैक्षणिक पात्रता :
शास्त्र/अभियांत्रिकी/भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच यामधील कामाचा २ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, ArcG.I.S., Q.G.I.S, Grass या सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक.

३) उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert / Social Expert ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाची समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी /MSW अर्हताधारक असावा व ग्रामीण भागात काम करण्याचा किमान अनुभव असावा. संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे.

वयाची अट : १० एप्रिल २०२२ रोजी २१ ते ३० वर्षे

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९१.

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती
  • Police Bharti Question Set- 10
  • Police Bharti Question Set- 9
  • Police Bharti Question Set- 8
  • Police Bharti Question Set- 7

See also  MPSC मार्फत विविध पदांच्या २२८ जागांसाठी भरती