Bhandara District Police Bharti 2019 Exam Question Paper: भंडारा जिल्हा पोलीस शिपाई 2019 प्रश्नपत्रिका


Bhandara District Police Bharti 2019 Exam Question Paper

Bhandara District Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

भंडारा जिल्हा पोलीस शिपाई 2019

Exam date: दि. 28 ऑक्टोबर 2021

1.भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे.

1) मोहाडी

2) तुमसर

3) साकोली

4) लाखनी

उत्तर:2) तुमसर

 

2.भंडारा जिल्ह्यातील प्रसिध्द गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती?

1) ऑक्टोबर 1984

2) डिसेंबर 1984

3) ऑक्टोबर 1983

4) डिसेंबर 1983

उत्तर:1) ऑक्टोबर 1984

 

  1. दूरसंचार क्षेत्रातील 5-जी तंत्रज्ञानाबाबत गैरलागू विधान कोणते?

1) 4-जी च्या तुलनेत 1 लक्ष पटीने नेटवर्कची गती वाढेल.

2) स्वयंचलित वाहनात वापर करून वाहनचालकांच्या व वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.

3) आरोग्य क्षेत्रात वापर केला जाऊन आजारांवर उपचार करण्यात मदते होणार आहे.

4) या तंत्रज्ञान उभारणीला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची गरजआहे.

उत्तर:1) 4-जी च्या तुलनेत 1 लक्ष पटीने नेटवर्कची गती वाढेल.

 

4.कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टीट्युशन म्हणून ओळखले जाते?

1) 44 वी

2) 42 वी

3) 43 वी

4) 41 वी

उत्तर:2) 42 वी

 

  1. भारत-चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे?

1) उत्तराखंड

2) अरुणाचल प्रदेश

3) सिक्कीम

4) यापैकी नाही

उत्तर:4) यापैकी नाही

 

  1. PIZकॅमेरे आजकाल मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. PIZ याचाफुलफॉर्म काय आहे?

1) Pan-Tilt- Zoom

2) Pro-Tilt-Zoom

3) Photo-Telecom-Zoom

4) यापैकी नाही

उत्तर:1) Pan-Tilt- Zoom

 

  1. शहर व विमानतळ याबाबतची चूक जोडी ओळखा.

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ- नागपूर

2) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ -मुंबई

3) अर्जुन मुंडा विमानतळ -गोंदिया

4) स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ – रायपूर

उत्तर: 3) अर्जुन मुंडा विमानतळ गोंदिया

 

  1. महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे?

1) एस.सी. जमीर के शंकरनाराणसी. विद्यासागरराव भगतसिंग कोश्यारी

2) एस. सी. जमीर महम्मद फजल सी. विद्यासागरराव भगतसिंग कोश्यारी

3) एस. एम. कृष्णा महम्मद फजल एस.सी. जमीर भगसिंग कोश्यारी

4) पी.सी. अलेक्झांडर महम्मद फजल सी. विद्यासागरराव भगतसिंग कोश्यारी

उत्तर: 1) एस.सी. जमीर के शंकरनाराणसी. विद्यासागरराव भगतसिंग कोश्यारी

 

9.सर्वोत्तम भुमिपूत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?

1) डॉ. रावसाहेब कसबे

2) डॉ. उत्तम कांबळे

3) डॉ. आ. ह. साळुंखे

4) डॉ. आनंद यादव

उत्तर:3) डॉ. आ. ह. साळुंखे

 

  1. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात. हे विधान….आहे.

1) बरोबर

2) चूक

3) अवास्तव

4) यापैकी नाही

उत्तर:1) बरोबर

 

  1. आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वकता त्रिज्येच्या ……. असते.

1) निम्मे

2) दुप्पट

3) एक तृतीयांश

4) तीन पट

उत्तर:1) निम्मे

  1. नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर बीजेचा आवाज ऐकूआला. तर बीज नीतापासून किती अंतरावर असेल?.

1) 1 कि.मी.

2) 1200 मी

3) 960 मी.

4) 1360 मी.

उत्तर:4) 1360 मी.

 

  1. घटना समितीने जन-गण-मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यतादिली?

1) 24 आनेवारी 1950

2) 15 ऑगस्ट 1947

3) 26 जानेवारी 1950

4) 24 ऑगस्ट 1947

उत्तर:1) 24 आनेवारी 1950

 

  1. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरु झाली?

1) 21 जानेवारी 1999

2) 22 ऑगस्ट 1994

3) 26 जानेवारी 1950

4) 24 ऑगस्ट 1947

उत्तर:2) 22 ऑगस्ट 1994

 

  1. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली?

1) 7 जुलै 1910

2) 1 जुलै 1912

3) 1 जून 1910

4) 12 जून 1912

उत्तर:1) 7 जुलै 1910

 

  1. 16. ब्रिक्स चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?

1) भारत

2) चीन

3) ब्राझील

4)नेपाल

उत्तर:2) चीन

 

  1. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे?

1) 73 व्या

2) 72 व्या

3) 74 व्या

4) 71 व्या

उत्तर:1) 73 व्या

 

  1. आदिवासी भागामध्ये आंबील हे एक….. आहे.

1) पय

2) औषध

3) खादय

4) शस्त्र

उत्तर:1) पय

 

  1. स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया ही मोहिम………शी संबंधितआहे.

1) शिक्षण

2) खेळ

3) उद्योग

4) मनोरंजन

उत्तर: 3) उद्योग

 

  1. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?

1) 2010

2) 2011

3) 2012

4) 2013

उत्तर:2) 2011

 

  1. एल-निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे नावआहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे?

1) बाळ

2) बाप

3) आई

4) बहिण

उत्तर:1) बाळ

 

  1. कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटीशांनी ……. साली प्लेगच्या साथीत केला होता.

1) 1897

2) 1898

3) 1920

4)1919

उत्तर:1) 1897

 

  1. तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?

1) 1856

2) 1860

3) 1861

4) 1855

उत्तर:4) 1855

 

  1. महाराष्ट्रातील कळसूबाई शिखराची उंची किती मीटर आहे?

1)1662

2) 1656

3) 1616

4) 1646

उत्तर:4) 1646

 

  1. नियमित मद्यपानामुळे (दारु पिल्यामुळे) या जीवनसत्वाचा शरिरास अभाव निर्माण होतो.

1) विटॅमीन-पी

2) विटॅमीन-सी

3) विटॅमीन-बी

4) विटॅमीन-के

उत्तर:3) विटॅमीन-बी

 

  1. पहिल्या दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?

1) 45

2) 55

3) 44

4) 66

उत्तर: 2) 55

 

  1. 25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?

1) 58

2) 48

3) 81

4) 71

उत्तर:4) 71

 

  1. 25, 75,100 या संख्यांचा लसावी काढा?

1) 100

2) 25

3) 300

4) 400

उत्तर:3) 300

 

  1. किमत काढा5+8(6÷2)-4 = किती?

1) 35

2) 25

3) 30

4) 78

उत्तर:2) 25

 

  1. 0.07+3.009+33.010+0.0013 =?

1) 36.0903

2) 36.3090

3) 36.0093

4) 36.9003

उत्तर: 1) 36.0903

 

  1. पुढील संख्येचे वर्गमुळ काढा.

2401

1) 41

2) 50

3) 53

4) 49

उत्तर:4) 49

 

  1. 9+9×9-9÷9=?

1) 79

2) 89

3) 81

4) 91

उत्तर:2) 89

 

33.9/11+ 7/11+27/11+1/11 =?

1) 2

2) 3

3) 5

4) 4

उत्तर:4) 4

 

  1. 826.325+ 405.275 =?

1) 1231.525

2) 1231.6

3) 1231.570

4) 12131.500

उत्तर: 2) 1231.6

 

  1. 54 व 36 या संख्यांचा म.सा.वी. काढा?

1) 18

2) 36

3) 54

4) 108

उत्तर:1) 18

 

  1. अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5, 2.8 3.2, 4.6, 2.5, 3.0, 2.4 किलोमीटर चालला. अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?

1) 3.3 कि.मी.

2) 3 कि.मी.

3) 4 कि.मी.

4) 4.6 कि.मी.

उत्तर:2) 3 कि.मी.

 

  1. 5000 चे 33 टक्के म्हणजे किती?

1) 1500

2) 1750

3) 165.33

4) 1650

उत्तर: 4) 1650

 

  1. स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रकमेच्या 20% रक्कम कपड्यांवर, 15% रक्कम फटाक्यांवर 10% रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33% रक्कम किराणा व इतर रक्कमकिरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्याजवळ 2200 रुपये उरले. तर स्वराजवळ एकूण किती रुपये होते?

1) 11000

2) 12000

3) 10000

4) 10500

उत्तर: 3) 10000

 

  1. एक रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25 टक्के तोटा होतो, तर रेडिओची मुळ किंमत किती असेल?

1) 6400

2) 3600

3) 7200

4) 6000

उत्तर:1) 6400

 

  1. एका रकमेची सरळव्याजाने 3 वर्षांची रास 628 रु. व 5 वर्षांची रास 662 रु. होते, तर ती रक्कम कोणती?

1) 577

2) 594

3) 600

4) 578

उत्तर: 1) 577

 

  1. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

1) 144 ची. सेंमी.

2) 49चौ. सेंमी.

3) 22चौ. सेंमी.

4) 154 चौ. सेंमी.

उत्तर:4) 154 चौ. सेंमी.

 

42.121 चा वर्ग किती?

1) 14641

2) 12144

3) 12142

4) यापैकी नाही

उत्तर:1) 14641

 

  1. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किमी असून त्याची रुंदी 400 मी. आहे. तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तरकाढा.

1) 1:2

2) 2:1

3) 1:3

4) 3:1

उत्तर: 4) 3:1

 

  1. एका प्राणीसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणीसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.

1) 15 सिंह 35 मौर

2) 25 सिंह, 4) 10 सिंह, 40 पोर

3) 20 सिंह, 30 मोर

4)10 सिंह 40 मोर

उत्तर:3) 20 सिंह, 30 मोर

 

  1. जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल, 3 मार्च 2011 पा दिवशी कोणता वार असेल?

1) बुधवार

2) सोमवार

3) गुरुवार

4) मंगळ

उत्तर:4) मंगळ

 

  1. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये प दयावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती रुपये मजरी दयावी लागेल ?

1) 4500

2) 4250

3) 4400

4) 4350

उत्तर: 2) 4250

 

  1. एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर साडेसात तासात कापावयाच असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल?

1) 4 किमी/तास

2) 0.5 किमी/तास

3) 2 किमी/तास

4) 2.5 किमी/तास

उत्तर:1) 4 किमी/तास

 

  1. एक दुकानदार एका दुरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो, त्यामुळे गिहाईकास तो संच 22250 रुपयांस मिळतो, तर त्या दुरदर्शन संचाची छापील किंमत काढा.

1) 30500. रु.

2) 200005.रु.

3) 250005.रु.

4) 25500 रु.

उत्तर:3) 250005.रु.

 

  1. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यांमध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक काढा.

1) 26/21

2) 11/6

3) 55/49

4) 12/7

उत्तर: 1) 26/21

 

  1. 1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?

1) 2600

2) 2520

3) 6561

4) 7250

उत्तर:2) 2520

 

  1. खालीलपैकी विजोड पद ओळखा.

1) प्रणाम

2) अभिनंदन

3) नमन

4) वंदन

उत्तर:2) अभिनंदन

 

  1. विजोड पद ओळखा.

1) PRT

2) HKM

3) BDF

4) RIV

उत्तर:2) HKM

 

  1. विस्तृत: व्यापक:जरब?

1) काळजी

2) वचक

3) त्वेष

4) शिक्षा

उत्तर:2) वचक

 

  1. डेसिग्रॅमला जसा सेटिग्रॅम, तसा कशाला डेकाग्रॅम…….?

1) किलोग्रॅम

2) हेक्टोग्रॅम

3) क्विंटल

4) ग्रॅम

उत्तर:2) हेक्टोग्रॅम

 

  1. मृण्मयी वर्षाला म्हणाली, तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते, तर वर्षा मृण्मयीची कोण?

1) मावशी

2) भावजय

3) आत्या

4) नणंद

उत्तर:3) आत्या

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 17.21, 26, 32, 39?

1)46

2) 47

3) 48

4) 45

उत्तर:2) 47

 

  1. एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कनमनलन असा लिहितात, तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा?

1) सननवनरतत

2) सनरनवनतन

3) सरबनतनन

4) नसनरनबर्तन

उत्तर:2) सनरनवनतन

 

  1. एका सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द 730526 असा लिहिला जातो, आणि GOPI हा शब्द 1498 असा लिहिला जातो, तरPARISH हा शब्द कसा लिहिला जाईल?

1)930826

2) 930526

3) 980236

4) 935026

उत्तर:1)930826

 

  1. एका सांकेतिक भाषेत 2 = 6, 4 = 20, 5 = 10 असे मानल्यास, त्याच सांकेतिक भाषेत 4 भागिले 5 =?

1) 2

2) 3

3)5

4) 6

उत्तर:1) 2

 

  1. मनूचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?

1) बुधवार

2) गुरुवार

3) मंगळवार

4) सोमवार

उत्तर: 1) बुधवार

 

  1. 1993 च्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी असेल?

1) रविवार

2) शुक्रवार

3) गुरुवार

4) सोमवार

उत्तर: 3) गुरुवार

 

  1. मनू हिचा सातवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

1) रविवार

2) शुक्रवार

3) गुरुवार

4) सोमवार

उत्तर:4) सोमवार

 

  1. 63. न ज व रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल?

1) रा

2) ज

3) व

4) न

उत्तर:4)

 

  1. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

1) पॉलीश

2) बैठक

3) लाकूड

4) हात

उत्तर: 3) लाकूड

 

  1. सोबतच्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत?

 

1) 2

2) 14

3) 3

4) 5

उत्तर:2) 14

 

66.काट्याच्या घड्याळामध्ये 6:00 वाजता तासकाटा व मिनीटकाटा यात किती अंशाचा कोन असेल?

1) 360

2) 180

3) 270

4) 90

उत्तर:2) 180

 

  1. सतलजचा रंग कोणता?

1) हिरवा

2) पांढरा

3) तांबडा

4) काळा

उत्तर:3) तांबडा

 

  1. कृष्णा हिचा रंग कोणता?

1) हिरवा

2) काळा

3) तांबडा

4) निळा

उत्तर: 1) हिरवा

 

  1. कावेरी हिचा रंग कोणता?

1) हिरवा

2) काळा

3) तांबडा

4) निळा

उत्तर:4) निळा

 

  1. खालील शब्दांमध्ये कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे?

कळस, गरम, सरळ, कमळ, मलम

1) ळ

2) स

3) म

4) र

उत्तर: 3)

 

  1. वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. एका विद्यार्थ्याला हे काम करायला 80 दिवस लागतात, तर4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील?

1) 320

2) 40

3) 20

4) 76

उत्तर:3) 20

 

72, समजा एका पोलिसाच्या गणवेषाचा खर्च973 रु. आहे, तर 1484 पोलिसांच्या गणवेषाचा खर्च किती?

1) 1443932

2) 1433932

3) 1403932

4) 1440932

उत्तर: 1) 1443932

 

  1. परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळापैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते, तर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेंमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेंमी. असेल?

1) 6

2) 24

3) 125

4) सांगता येणार नाही

उत्तर:3) 125

 

  1. दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौ. सें.मी. असेल, तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

1) 300 चौ. सेंमी.

2) 400 चौ. सेंमी.

3) 500 चौ. सेंमी.

4) 600 चौ. सेंमी.

उत्तर:2) 400 चौ. सेंमी.

 

  1. हत्तीला वाघ म्हटले, वाघाला हरिण म्हटले, हरणाला सिंह म्हटले, सिंहाला कोल्हा म्हटले, तर जंगलाचा राजा कोण?

1) हरिण

2) वाघ

3) सिंह

4) कोल्हा

उत्तर:4) कोल्हा

 

  1. सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे हा खालीलपैकी कोणत्याम्हणीचा अर्थ आहे?

1) ओझे उचलु, तर म्हणे बाजीराव कुठे

2) कामापुरता मामा

3) काखेत कळसा, गावाला वळसा

4) न कर्त्यांचा वार शनिवार

उत्तर:1) ओझे उचलु, तर म्हणे बाजीराव कुठे

 

  1. वाक्प्रचाराची अयोग्य जोडी निवडा.

1) मूग गिळणे -उत्तर न देता गप्प राहणे

2) मनाने घेणे- मनात पक्का विचार करणे

3) राम म्हणणे -सर्वत्र मान मिळवणे

4) वाटाण्याच्या अक्षदा लावणे- स्पष्टपणे नाकारणे

उत्तर: 3) राम म्हणणे -सर्वत्र मान मिळवणे

 

  1. कोणता दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो?

1) 12 डिसेंबर

2) 8 नोव्हेंबर

3) 27 फेब्रुवारी

4) 12 मार्च

उत्तर:3) 27 फेब्रुवारी

 

  1. दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडणारे……. होय.

1) उभयान्वयी अव्यय

2) क्रियापद

3) शब्दयोगी अव्यय

4) क्रियाविशेषण

उत्तर:1) उभयान्वयी अव्यय

 

  1. तो या सर्वनामाला ला हा विभक्ती प्रत्यय लावून…….हा शब्द तयार होतो.

1) तोला

2) तो ओला

3) त्याला

4) तिला

उत्तर: 3) त्याला

 

  1. योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य ओळखा.

1) अति तेथे माती! अशी म्हण आहे.

2) ‘अति तेथे माती’ अशी म्हण आहे.

3) अति तेथे माती, अशी म्हण आहे.

4) अति तेथे माती, अशी म्हण आहे!

उत्तर:2) ‘अति तेथे मातीअशी म्हण आहे.

 

  1. पुढील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.

पी हळद, हो गोरी

1) रंग उजळणे

2) गोरे होण्यासाठी हळद टाकून दूध पिणे

3) अतिशय उताविळपणा करणे

4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर:3) अतिशय उताविळपणा करणे

 

  1. पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.

1) रिकामटेकडा

2) खानेसुमारी

3) चिरगुट

4) ढेकूण

उत्तर:4) ढेकूण

 

  1. आता विश्वात्मके देवे। तोषोनी मज दयावे पसायदान हे ॥ या वाक्यातील रस ओळखा.

1) करुणरस

2) शांतरस

3) वीररस

4) शृंगाररस

उत्तर: 2) शांतरस

 

  1. बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) उत्प्रेक्षा

2) अतिशयोक्ती

3) अनुप्रास

4) रुपक

उत्तर: 3) अनुप्रास

 

  1. पुढील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

मौल्यवान

1) कवडीमोल

2) क्षणभंगूर

3) अमूल्य

4) महत्वाचे

उत्तर: 1) कवडीमोल

 

  1. पोपट आकाशात उडाला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी

2) कर्मणी

3) भावे

4) नवीन कर्मणी

उत्तर:1) कर्तरी

 

  1. चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा.

1) अपूर्ण भूतकाळ

2) पूर्ण भूतकाळ

3) अपूर्ण भविष्यकाळ

4) अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर: 1) अपूर्ण भूतकाळ

 

  1. दिपोत्सव या संधीची योग्य फोड करा.

1) दीपा + उत्सव

2) दिपो + त्सव

3) दीप + उत्सव

4) दिपो + उत्सव

उत्तर:3) दीप + उत्सव

 

  1. कमळ फुले मुलगी हसे, असेच मला वाटे (अलंकार ओळखा.)

1) अर्थान्तरन्यास

2) चेतनागुणौक्ती

3) उत्प्रेक्षा

4) विरोधाभास

उत्तर: 3) उत्प्रेक्षा

 

  1. किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?

1) जीवनलहरी

2) पृथ्वी

3) प्रणयप्रभा

4) मालिनी

उत्तर:3) प्रणयप्रभा

 

  1. शब्दयोगी अव्यय ओळखा.

1) बापरे

2) आणि

3)गावाबाहेर

4) देशात

उत्तर:3)गावाबाहेर

 

  1. हार या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

1) हारी

2) हाऱ्या

3) हार

4)हारे

उत्तर:3) हार

 

  1. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

1) आशिर्वाद

2) आशीर्वाद

3) आशीरवाद

4) आशीवार्द

उत्तर: 2) आशीर्वाद

 

  1. भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे…….होय.

1) वर्ण

2)लिपी

3) वर्णमाला

4) व्याकरण

उत्तर: 4) व्याकरण

 

  1. 96. मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा.

1) चर्तुथी

2)पंचमी

3)षष्ठी

4) तृतीया

उत्तर:2)पंचमी

 

  1. गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नामे सांगा?

1) गंगा, हिमालय

2) गंगा, नदी

3) हिमालय पर्वत

4) फक्त हिमालय

उत्तर: 1) गंगा, हिमालय

 

  1. मितभाषी या शब्दाचा अर्थ काय आहे?

1) मोजके व कमी बोलणारा

2) कमी खाणारा

3) न रागवणारा

4) काटकसरीने राहणारा

उत्तर: 1) मोजके व कमी बोलणारा

 

  1. चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहे?

1) तत्पुरुष

2) समाहार द्वंद्व

3) बहुव्रीही

4) अव्ययीभाव

उत्तर:2) समाहार द्वंद्व

 

100.कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्दआहे?

1) सोने

2)चांदी

3)रजत

4)हिरा

उत्तर:1) सोने


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  RBSE 12th Result 2022 | राजस्थान बोर्ड 12वीं परीक्षा रिजल्ट हुआ जारी