चालू घडामोडी : ०५ फेब्रुवारी २०२२

Current Affairs : 05 February 2022

चांद्रयान-3 मोहिम ऑगस्ट महिन्यात

Chandrayan-2 ने चंद्रमा पर क्रेटर की खींची तस्वीर, ISRO ने दिया यह नाम...

2022 मध्ये इस्रो तब्बल 19 मोहिमा हाती घेत आहे.
विशेष म्हणजे बहुचर्चित चांद्रयान-३ ( Chandrayaan-3)मोहिम ही याच वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

2019 च्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चांद्रयान-2 मोहिम पार पडली होती. याचबरोबर वर्षभरात इस्रोच्या तब्बल 19 मोहिमा पार पाडल्या जाणार असून यामध्ये 8 उपग्रह प्रक्षेपण मोहिमा, 7 विविध प्रकारच्या अवकाश यानाबाबत मोहिमा आणि 4 तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक संदर्भात मोहिमा असणार आहेत. तर या मोहिमांमध्ये RISAT-1A या उपग्रहाचे पुढील काही दिवसात PSLV या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण होणार आहे.बीजिंग

ऑलिम्पिक सोहळ्यावर भारताचा बहिष्कार

बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक सोहळ्यात मशालवाहक म्हणून गलवान खोऱ्यातील भारताबरोबरच्या संघर्षात सहभागी असलेल्या सैनिकाचा समावेश केल्याने भारताने आक्षेप नोंदवला आहे़. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय जवानांबरोबरच्या संघर्षात सहभागी असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कमांडरचा समावेश या सोहळ्यासाठीच्या मशालवाहकांमध्ये करण्यात आला़.

ऑलिम्पिक सोहळ्याच्या या राजकीयीकरणावर भारताने आक्षेप घेतला़ या सोहळ्यांमध्ये भारताचे राजदूत सहभागी होणार नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले़. त्यानंतर ‘प्रसार भारती’ने ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे दूरदर्शनवर प्रक्षेपण करणार नसल्याचे जाहीर केले़.

अर्थसंकल्प २०२२मध्ये ‘ई-पासपोर्ट’ची घोषणा; परदेशी यात्रेत नागरिकांना मिळणार ‘ही’ सुविधा

ഇ-പാസ്‍ പോർട്ട്​ ഈ വർഷം | E-Passport this year | Madhyamam

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प २०२२ मध्ये ई-पासपोर्टसंबंधी मोठी घोषणा केली आहे. २०२२-२३ या वर्षात भारतामध्ये ई-पासपोर्ट जारी केली जातील

काय आहे ई-पासपोर्ट ?
ई-पासपोर्ट सामान्यतः आपल्या नियमित पासपोर्टची डिजिटल आवृत्ती असेल. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवली असेल जी डेटा सुरक्षिततेसाठी मदत करेल.
या मायक्रोचिपमध्ये पासपोर्टधारकाचे नाव आणि जन्मतारखेसह इतर माहिती असेल.
हा पासपोर्ट जारी करण्यात आल्यानंतर इमिग्रेशनसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगेतून नागरिकांची सुटका होणार आहे. यामध्ये बसवण्यात आलेल्या चिपच्या मदतीने पासपोर्ट इमिग्रेशन काउंटरवर सहजपणे स्कॅन केला जाईल.

दिनविशेष

• 4 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
• शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला होता.
• सन 1944 मध्ये चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच केली होती.
• श्रीलंका देशाला सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.

See also  MPSC मार्फत सन 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक