ST महामंडळ, जालना येथे विविध पदांची भरती

MSRTC Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जालना येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज नोंदणी करण्याचा किंवा अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०२२ आहे. MSRTC Bharti 2022

एकूण जागा : ३४

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी / Graduate/ Diploma Engineering ०१
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकेनिक / ॲटोमोवाईल अभियंता शाखेतील पदवी/पदविका धारण केलेली असावी.

२) यांत्रिकी मोटार गाडी (एम.एम.व्ही.) / Mechanical Motor Vehicle २०
शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. ०२) उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय दोन वर्षांचा मोटार मॅकेनिक व्यवसायाचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा.

३) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक. ०२) उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय दोन वर्षांचा इलेक्ट्रीशियन कोर्स (ट्रेड) परिक्षा पास असणे आवश्यक.

४) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder ०९
शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक. ०२) उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय मध्ये शिटमेटल व्यवसाय परिक्षा पास असणे आवश्यक.

५) वेल्डर (सांधाता ) / Welde ०१
शैक्षणिक पात्रता
: ०१) उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक. ०२) उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय मध्ये वेल्डर व्यवसाय परिक्षा पास असणे आवश्यक.

वयाची अट : ०७ डिसेंबर २०२२ रोजी १४ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५९०/- रुपये [मागासवर्गीय – २९५/- रुपये]
वेतन : ७,०००/- रुपये ते ९५३५/- रुपये.

नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, रा. प. विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, एन. आर. बी. कंपनी समोर, औरंगाबाद रोड, जालना.
अर्जाची शेवटची तारीख : ०७ डिसेंबर २०२२ आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज नोंदणी (Apply Online) : येथे क्लिक करा

See also  MPSC उमेदवारांसाठी गुडन्यूज.. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येत मोठी वाढ

निवड प्रक्रिया –

विविध व्यवसायाकरिता जी शैक्षणिक पात्रता विहित करण्यात आलेली आहे ती उत्तीर्ण असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या गुणवत्तेनुसार शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवाराने नेमणुक पुर्व त्यांचे विद्यावेतन त्यांचे खाती जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचे बचत खाते क्रमांकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
विविध व्यवसायाकरीता एक वर्ष प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीचा रितसर विहित केलेला करारनामा भरुन (MSRTC Recruitment 2022) दयावा लागेल, प्रशिक्षण कालावधी संपण्यापुर्वी शिकाऊ उमेदवार शिकाऊ उमेदवारी सोडून गेल्यास अथवा गैरहजर राहिल्यास पाठ्यवेतनाची रक्कम किंवा अॅप्रेंटीस अॅडव्हायझर ठरवतील ती रक्कम नुकसान भरपाई म्हणुन दयावी लागेल.
रक्कम न भरल्यास ॲप्रेटींस कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्या नंतर त्यांना रा.प. महामंडळाच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही व कोणताही अग्रहक्क राहणार नाही.
सदर भरती प्रक्रियेमध्ये पुर्णतः अथवा अंशतः बदल करण्याचे अधिकार रा.प. महामंडळ रोखुन ठेवत आहे.