Satara Police Bharti 2019 Exam Question Paper: सातारा पोलीस भरती 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका


Satara District Police Bharti 2019 Exam Question Paper

Satara Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

सातारा जिल्हा पोलीस शिपाई 2019

 Exam date- दि. 21 सप्टेंबर 2021

 

  1. Aहा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे?

1) C

2) A

3) B

4) D

उत्तर:3) B

 

  1. 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल. तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?

1) गुरुवार

2) शुक्रवार

3) रविवार

4) शनिवार

उत्तर:2) शुक्रवार

 

  1. दुपारी दिड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?

1) 7

2) 6

3) 5

4) 4

उत्तर:3) 5

 

प्र.क्र4.व5 साठी:एका रांगेत पहिल्या मुलानंतर एक मुलगी, दुसऱ्या मुलानंतर 2 मुली, तिसऱ्या मुलानंतर 3 मुली,……..याप्रमाणे एकूण 45 मुले उभी आहेत, तर…

4.45 मुलांमध्ये एकूण मुली किती?

1) 24

2) 36

3) 28

4) 8

उत्तर: 2) 36

 

  1. पाचव्या मुलाचा त्या रांगेतील पुढून क्रमांक कितवा?

1) 10

2) 5

3) 15

4) 20

उत्तर:3) 15

 

6.खालील पर्यायांमध्ये वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे?

1) हय

2) अश्व

3) वारु

4)गदर्भ

उत्तर:4)गदर्भ

 

7)लयबध्द शब्दरचनेला………म्हणतात.

1) गद्य

2) पदय

3) निबंध

4) वर्ण

उत्तर:2) पदय

 

8.माणसापरीस मेंढरं बरी या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

1) शब्दयोगी

2) क्रियाविशेषण

3) केवलप्रयोगी

4) उभयान्वयी

उत्तर:1) शब्दयोगी

 

9.उद्देश वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा.

1) सुधा निबंध लिहिते.

2) सुधा निबंध लिहित आहे.

3) सुधाने निबंध लिहिला आहे.

4) सुधा निबंध लिहिणार आहे.

उत्तर: 4) सुधा निबंध लिहिणार आहे.

 

  1. 10. इतिश्री होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?

1) यश मिळवणे

2) समाप्त होणे

3) अत्यानंद होणे

4) सर्व काही ठिक असणे

उत्तर:2) समाप्त होणे

 

11.खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे?

1) पायपोस

2) केवल

3)रयत

4)आलमारी

उत्तर: 1) पायपोस

 

  1. खालीलपैकी कोणता व्यंजनगट ओष्ठ्य वर्गात येतो?

1) त थ द ध

2) क ख ग घ

3) द ठ व ण

4) प फ वम

उत्तर: 4) प फ वम

 

  1. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही?

1) विशेषनाम

2) सामान्यनाम

3) यापैकी दोन्ही

4) यापैकी नाही

उत्तर:1) विशेषनाम

 

  1. वाघ या शब्दाचे बरोबर स्त्रिलिंगी रूप ओळखा.

1) वाघीण

2) वाधीन

3) वाघिन

4) वार्षिण

उत्तर:1) वाघीण

 

  1. आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरु झाला. वाक्य प्रकार ओळखा.

1) संयुक्त वाक्य

2) केवल वाक्य

3) संकेतार्थी वाक्य

4) मिश्र वाक्य

उत्तर:1) संयुक्त वाक्य

 

  1. शुध्द शब्द ओळखा.

1) प्रचीतयश

2) अभीष्टचिंतन

3) अध्यात्मिक

4) यापैकी सर्व

उत्तर:2) अभीष्टचिंतन

 

  1. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात?

1) द्विज

2) द्विपकल्प

3) दाआब

4) तिठा

उत्तर: 3) दाआब

 

  1. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

1) निष्प्रभ x तेजस्वी

2) निविड x विरळ

3) विदेश x परदेश

4) देवी x आसुरी

उत्तर: 3) विदेश x परदेश

 

  1. एखादयाचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.

1) कुन्हाडीला दांडा गोतासकाळ

2) खाई त्याला खवखवे

3) आपलेच दात आणि आपलेच ओठ

4) गुरुची विद्या गुरुला फळली

उत्तर: 4) गुरुची विद्या गुरुला फळली

 

  1. बोलतांना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण दयावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात?

1) स्वल्पविराम

2) अर्धविराम

3) संयोगचिन्ह

4) अपसारणचिन्ह

उत्तर:4) अपसारणचिन्ह

 

  1. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) भावे प्रयोग

2) कर्मणी प्रयोग

3) अकर्मक कर्तरी प्रयोग

4) सकर्मक कर्तरी प्रयोग

उत्तर:3) अकर्मक कर्तरी प्रयोग

 

  1. चाकूने पेरु कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा.

1) तृतीया

2) पंचमी

3) आपादान

4) पंचमी

उत्तर:1) तृतीया

 

  1. खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

1) निरोगी

2)शोर्य

3) आरोग्यसंपन्न

4) सुदृढ

उत्तर:2)शोर्य

 

  1. हा ही, हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

1) संबंधी सर्वनामे

2) प्रश्नार्थक सर्वनामे

3) दर्शक सर्वनामे

4) आत्मवाचक सर्वनामे

उत्तर: 3) दर्शक सर्वनामे

 

  1. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

1) गाईचे-हवरणे

2) हत्तीचे-चित्कारणे

3) गाढवाचे-खिकाळणे

4) म्हशीचे-रेकणे

उत्तर:3) गाढवाचे-खिकाळणे

 

  1. दहा घरची धुणी-भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईंचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो?

1) विनाशकाले विपरित बुद्धी

2) दुरून डोंगर साजरे

3) खायला काळा आणि भुईला भार

4) नाव मोठे आणि लक्षण खोटे

उत्तर: 3) खायला काळा आणि भुईला भार

 

  1. वेगळा पर्याय ओळखा.

1) दीन-श्रीमंत

2) कुत्रा श्वान

3) कावळा एकाक्ष

4) कुभांड-कट

उत्तर:1) दीन-श्रीमंत

 

  1. कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ….

1) लेखनात कमीपणा वाटणे

2) कागदाचे घोडे करून नाचवणे

3) पुढे-पुढे करणे

4) अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे

उत्तर:4) अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे

 

  1. योग्य पर्याय ओळखा. अध्ययन =

7) अधि+अयन

2) अध्य+यान

3) अधू+आयन

4) अधी+आयन

उत्तर:7) अधि+अयन

 

  1. पुढील शब्दांचा संधी करा. जगत् ईश्वर

1) जगदीश्वर

2) जगदिश्वर

3)जगदैश्वर

4) यापैकीनाही

उत्तर:1) जगदीश्वर

 

  1. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने……ही यंत्रणा स्थापन केली.

1) NIA

2) CBI

3) IB

4) फोर्सवन

उत्तर: 4) फोर्सवन

 

32.गावचा पोलीस पाटील…….कडून नियुक्त केला जातो.

1) जिल्हाधिकारी

2) उपविभागीय अधिकारी

3) उपविभागीय पोलीस अधिकारी

4) तहसिलदार

उत्तर:2) उपविभागीय अधिकारी

 

  1. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?

1) प्रौढ साक्षरता

2) महिला सक्षमीकरण

3) मुलींचे शिक्षण

4) हरवलेल्या मुलामुलीचा शोध घेवून कुटुंबापर्यंत पोहोचविणे

उत्तर:4) हरवलेल्या मुलामुलीचा शोध घेवून कुटुंबापर्यंत पोहोचविणे

 

  1. पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेषात खांदयावर कोणती चिन्हे असतात?

1) तीन स्टार

2) अशोक स्तंभ

3) अशोकस्तंभ व एक स्टार

4) अशोकस्तंभ व एक स्टार

उत्तर: 1) तीन स्टार

 

  1. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (CrPC)मधील कलम …नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.

1) 31

2)35

3) 41

4) 51

उत्तर:3) 41

 

  1. महाराष्ट्र पोलिस ध्वजातील………..हे पारंपारिक चिन्ह आहे.

1) पंचकोनी तारा

2) षटकोनी तारा

3) राजमुद्रा:

4) अशोकचक्र

उत्तर:1) पंचकोनी तारा

 

  1. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीसध्वज ……….या दिवशी प्रदान केला.

1) 1 मे 1960

2) 2 जानेवारी 1961

3) 2 ऑक्टोबर 1961

4) 26 जानेवारी 1961

उत्तर:2) 2 जानेवारी 1961

 

  1. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा आहे?

1) सहा

2) तीन

3) चार

4)पाच

उत्तर:1) सहा

 

  1. मनाचे श्लोक कोणी लिहिले?

1) संत ज्ञानेश्वर

2) संत रामदास

3) संत तुकाराम

4) संत एकनाथ

उत्तर: 2) संत रामदास

 

  1. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरु केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता?

1) अनाथ मुलींना शिक्षण

2) विधवांना शिक्षण

3) विधवा पुनर्विवाहीतांना आधार

4) पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षणा

उत्तर: 2) विधवांना शिक्षण

 

  1. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?

1) मैना

2.) भारद्वाज

3) हरियाल

4) मोर

उत्तर:3) हरियाल

 

  1. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?

1) सातारा

2) वाई

3) कराड

4) फलटण

उत्तर:2) वाई

 

  1. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?

1) पुणे-बंगळुरु

2) कराड-चिपळूण

3) सातारा-पाटण

4) पुणे-महाबळेश्वर

उत्तर: 4) पुणे-महाबळेश्वर

 

  1. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

1) वैतरणा

2) तानसा

3) कोयना

4)शास्त्री

उत्तर:3) कोयना

 

  1. 45. पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?

1) जॉन चेसन

2) लॉर्ड लॉडविक

3) सर फर्ग्युसन

4) सर सिडने

उत्तर:1) जॉन चेसन

 

  1. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

1) सांगली

2) सातारा

3) सोलापूर

4) अहमदनगर

उत्तर:3) सोलापूर

 

  1. सातारा जिल्ह्यातील धरणे कोणती?

अ. कोयनाब. धोम क. कन्हेरड. वीर

1) फक्त अ

2) फक्त अ, ब

3) फक्त अब

4) अ, ब, क, ड सर्व

उत्तर: 4) अ, ब, क, ड सर्व

 

48.ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशासंबंधी आहे?

1) पुरनियंत्रण

2) पुरव्यवस्थापन

3) वाढीव दुध उत्पादन व संकलन

4) वाढीव अन्न उत्पादन

उत्तर: 3) वाढीव दुध उत्पादन व संकलन

 

  1. चाबाहार हे बंदर कोणत्या देशात आहे?

1) अफगाणिस्तान

2) इसक

3) कुवेत

4) इराण

उत्तर: 4) इराण

 

  1. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1) 5 जून

2) 1 ऑगस्ट

3) 3 जानेवारी

4) 1 डिसेंबर

उत्तर:1) 5 जून

 

  1. भारतात खालीलपैकी कोणते राज्य (भाषिक तत्वावर) सर्वप्रथम अस्तित्वात आले?

1) आंध्रप्रदेश

2) तामिळनाडू

3) कर्नाटक

4) महाराष्ट्र

उत्तर:1) आंध्रप्रदेश

 

  1. महाबळेश्वरजवळील भिलार हे……… चे गाव आहे.

1) पैलवानांचे

2) दुधातुपाचे

3) गिर्यारोहकांचे

4) पुस्तकांचे

उत्तर: 4) पुस्तकांचे

 

  1. RT-PCR या कोरोनावरील चाचणीचे पुर्ण रूप ओळखा.

1) Reserve Transcription Polymerase Chain Reaction

2) Reverse Transition Polymerase Chain Reaction

3) Reverse Transcription Polymerase Chain Reaction

4) Reverse Transcription Polymerase Change Reaction

उत्तर: 3) Reverse Transcription Polymerase Chain Reaction

 

  1. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेताना नीरज चोप्रा याने किती मीटर अंतरावर भाला फेकला?

1) 87.58

2) 85.78

3) 88.57

4) 87.85

उत्तर:1) 87.58

 

  1. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते.

1) पोलीस महानिरिक्षक

2) पोलीस आयुक्त

3) पोलीस महासंचालक

4) पोलिस अभियोक्ता

उत्तर: 3) पोलीस महासंचालक

 

  1. -15/5+12/7-19/7=?

1)-2 1/3

2)-3 1/7

3) 5 2/3

4) 4 1/5

उत्तर:2)-3 1/7

 

57.4 2/5+5 1/2+=?

1)-2 1/3

2)-3 1/7

3)5 2/3

4)9 9/10

उत्तर:4)9 9/10

 

  1. जर AxB×C = 320 तर खालीलपैकी ची किंमत कोणती असू शकत नाही?

1) 3

2) 2

3) 0

4)5

उत्तर:3) 0

 

  1. 4 + 44 + 444+ 4444+…….या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणीकोणता आकडा येईल?

1)1

2)9

3) 3

4 6

उत्तर: 1)1

 

  1. दोन संख्यांचा मसावि 15 आहे तसेच त्यांचा लसावी 90 आहे जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती?

1).20

2) 25

3) 35

4) 30

उत्तर:4) 30

 

  1. A, BवC हे तीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदुजवळ भेटतील?

1) 3

2) 5

3) 6

4) 9

उत्तर: 1) 3

 

  1. जर + X 1 = 19 ते 1 =? X

1) 323

2) 359

3) 219

4) 248

उत्तर: 2) 359

 

  1. 15 सरफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली होती. पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडांवरील सर्व सफरचंदे काढण्यात आली. तर झाडांवर किती सफरचंदे शिल्लक राहिले?

1)61

2) 96

3) 65

4) 67

उत्तर:2) 96

 

  1. पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात 5 फेऱ्या पुर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येकवेळी 45 प्रवासी होते. बसचे तिकिट प्रत्येकी 80 रु. असल्यास दिवसभरात त्याच बसचे एकूण उत्पन्न किती?

1) 27200

2) 18000

3) 36000

4) 35550

उत्तर:3) 36000

 

  1. रमेशला सुरेशच्या पागाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार रु. 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?

1) 1500 रु

2) 2000 रु

3) 3000 रु

4) 2500 रु

उत्तर: 3) 3000 रु

 

  1. एका जंगलामध्ये काही मोर व काही हरिण उभे आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा 76 ने अधिक आहे. तर त्यातील हरिणांची संख्या किती?

1) 19

2) 57

3) 42

4) 38

उत्तर:4) 38

 

  1. अमित, अनिल व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:3 आहे. जर तिघांचे एकूण वय 60 वर्षे असल्यास आशिषचे वय किती ?

1) 18 वर्ष

2) 20 वर्षे

3) 22 वर्षे

4) 24 वर्षे

उत्तर: 1) 18 वर्ष

 

  1. एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे. जर 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते. तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?

1) 125

2) 150

3) 145

4) 155

उत्तर:4) 155

 

  1. दोन समान लांबीच्या रेल्वेगाड्या एकमेकींच्या विरुध्द दिशांनी धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी प्रतितास आहे. जर त्या दोन्ही गाड्या परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात, तर त्यांची प्रत्येकी लांबी किती?

1) 270 मीटर

2) 150 मीटर

3) 315 मीटर

4) 330 मीटर

उत्तर:3) 315 मीटर

 

  1. एक व्यक्ती या बिंदू पासून 20 किमी प्रतीतास या वेगाने Q या बिंदूकडे निघालेला आहे. आणि त्याचवेळी दुसरा व्यक्ती Q या बिंदूपासून 30 किमी प्रतितास या वेगाने Pया बिंदूकडे निघालेला आहे. जर ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर P ते Q हे अंतर किती असेल?

1) 100 मीटर

2) 150 मीटर

3) 200 मीटर

4) 250 मीटर

उत्तर: 4) 250 मीटर

 

  1. 18 कामगार रोज 8 तास काम करुन एक काम 12 दिवसात पुर्ण करतात. तर तेच काम रोज 9 तास याप्रमाणे करून 16 दिवसात पुर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील?

1) 16

2) 14

3) 10

4) 12

उत्तर: 4) 12

 

  1. 20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात. तर 300 चादरींवर 14 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील?

1) 45

2) 54

3) 49

4) 61

उत्तर:1) 45

 

  1. P. या नळाने एक टाकी 12 तासात भरते. आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरु केले, तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

1) 20 तास

2) 30 तास

3) 50 नास

4) 60 तास

उत्तर: 4) 60 तास

 

  1. एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल, तर त्या संख्येची 55% किंमत किती?

1) 165

2) 175

3) 180

4) 195

उत्तर: 1) 165

 

  1. Aचा पगार 18800 रुपये आहे तसेच Bचा पगार 4000 रुपये आहे. तर चा पगार B च्या किती % आहे?

1) 450

2) 470

3) 480

4) 490

उत्तर: 2) 470

 

  1. एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली. नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली. तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला?

1) 35%

2) 25/%

3) 20%

4) यापैकी नाही

उत्तर: 1) 35%

 

  1. एका गावची लोकसंख्या 6000 आहे. त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती?

1) 3840

2) 3450

3) 3500

4) 4200

उत्तर: 1) 3840

 

  1. एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले, तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले. तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती?

1) 15%

2) 20%

3) 25%

4) 18%

उत्तर: 2) 20%

 

  1. Aआणि B या दोघांची अनुक्रमे 1, 40,000 आणि 1, 50,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. जर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपयांचा नफा होत असेल, तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत?

1) 56000, 60000

2) 60000, 56000

3) 62000, 58000

4) 58000, 62000

उत्तर: 1) 56000, 60000

 

80.एका त्रिकोणाचा पाया 15 सेंमी आणि उंची 12 सेंमी आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेंमी आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्याक्षेत्रफळाच्या दुप्पट आहे, तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती?

1) 9 सेंमी.

2) 18 सेमी

3) 8 सेमी

4) 12.5 सेंमी

उत्तर:2) 18 सेमी

 

81.A हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C या बहिणी आहेत. तर C चे Aशी नाते का?

1) भाऊ

2) पुतणी

3) काकी

4) पुतण्या

उत्तर: 2) पुतणी

 

  1. विधाने अ. काही गाजर वांगे आहेत. ब. काही वांगे सफरचंद आहेतक. सर्व सफरचंद केळी आहेत.

निष्कर्ष:1. काही सफरचंद गाजर आहेत.

  1. काही केळी वांगे आहेत.
  2. काही केळी गाजर आहेत.

1) 1 आणि 3 योग्य

2) फक्त 2 योग्य

3) 1 आणि 2 योग्य

4) सर्व योग्य

उत्तर:2) फक्त 2 योग्य

 

प्र.क्र.83 ते 85 साठी P.Q.R.S.T.U.V आणि W हे आठ मित्र वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहेत.

  1. W हा P च्या डाव्या बाजुला आहे. पण किंवा S च्या शेजारी नाही.
  2. Uहा Q च्या जवळ उजव्या बाजुला आहे आणि हा T च्या

शेजारी आहे. 3. R हा T आणि या दोघांमध्ये आहे. तर

 

83.खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

1) T हा U आणि Q यांच्यामध्ये आहे.

2) U हा V च्या शेजारी आहे.

3) V हा W आणि T यांच्या दरम्यान आहे.

4) यापैकी नाही

उत्तर: 3) V हा W आणि T यांच्या दरम्यान आहे.

 

  1. S चे स्थान काय?

1) Q च्या डाव्या बाजुला आहे

2) 0 च्या उजव्या बाजुला दुसऱ्या स्थानावर आहे.

3) Q आणि U च्या दरम्यान आहे

4) यापैकी नाही

उत्तर: 1) Q च्या डाव्या बाजुला आहे

 

  1. V चे स्थान काय?

1) Sच्या डाव्या बाजुला दुसरे स्थान

2) U च्या उजव्या बाजुला तिसऱ्या स्थानी

3) W स्या उजव्या बाजुला

4) यापैकी नाही

उत्तर: 2) U च्या उजव्या बाजुला तिसऱ्या स्थानी

 

  1. एका मैदानात,
  2. कुमार हा अंकुरच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे.
  3. देव हा कुमारच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे.
  4. निलेश हा अंकुरच्या पशिचेकडे 25 मीटर अंतरावर आहे.
  5. पिंदु हा देवच्या उत्तरेकडे 90 मीटर अंतरावर आहे

जर एक मुलगा निलेशकडून अंकुरकडे चालत जातो, नंतर अंकुरकडून कुमारकडे, नंतर कुमारकडून देवकडे, नंतर देवकडून पिंटुकडे चालत जातो. तर तो एकूण किती अंतर चालला?

1) 215 मी.

2) 155 मी.

3) 245 मी.

4) 145 मी.

उत्तर:2) 155 मी.

 

  1. एका रांगेमध्ये 4 चा क्रमांक पुढून 18 वा आहे. तसेच B चा क्रमांक मागून 16 वा आहे. Cचा क्रमांक पुढून 25 वा असून तो A आणि B यांच्या मध्यभागी आहे, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

1) 45

2) 46

3) 47

4) 44

उत्तर: 1) 45

 

  1. CGK, FJN, IMQ.?

1) SPL

2) NIH

3) LPT

4) OLP

उत्तर: 3) LPT

 

89.121, 144, 289, 324, 529, 576:?

1) 961

2) 841

3) 900

4) 729

उत्तर: 2) 841

 

  1. LJPN: KMOQ::YSUW:?

1) YVSZ

2) XUTZ

3) YVTZ

4) XVTZ

उत्तर:4) XVTZ

 

  1. K_mk_Imkkl_kk_mk

1) lklm

2) Ikml

3) Ikmk

4) Ikmm

उत्तर:2) Ikml

 

  1. विधान पाउस पडतो तेव्हा, X घराबाहेर पडत नाही. X बाहेर गेलाआहे.

निष्कर्ष : 1. सध्या पाऊस पडत नाही.

  1. X बाहेर गेला कारण त्याचे काही महत्वाचे काम होते

1) फक्त 1

2) फक्त 2

3) 1 आणि 2

4) यापैकी कोणताही नाही

उत्तर:1) फक्त 1

 

  1. PROTECT.TCETOR.ROTEC,? OTE,ET

1) ROTE

2) CETO

3) OTEC

4) ETOR

उत्तर:2) CETO

 

  1. HG: BC::ML:?

1) RQ

2) HG

3) QR

4) GH

उत्तर:4) GH

 

  1. रेख, ?, त्रिकोण, चौकोन, पंचकोन

1) वर्तुळ

2) कोन

3) काटकोन

4) लघुकोन

उत्तर:2) कोन

 

  1. माधुरीची आई मीनाची आत्या लागते, तर मीनाची आई ही माधुरीच्याआईची कोण?

1) आत्या

2) बहिण

3) नणंद

4) वहिनी

उत्तर: 4) वहिनी

 

  1. BहाA चा पती आहे. ही C ची आई आहे. पण ही व्यक्तीची मुलगी नाही, D ही Aची बहिण आहे. तर D चे Aशी नाते काय?

1) बहिण

2) आत्या

3) मावशी

4) मामी

उत्तर: 3) मावशी

 

  1. मुलगी व आई यांच्या 5 वर्षापुर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल. तर मुलीचे आजचे वय किती?

1) 6 वर्षे

2) 10 वर्षे

3) 35 वर्षे

4) 11 वर्षे

उत्तर:4) 11 वर्षे

 

  1. वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर त्यांच्या वयांतील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती?

1) 40 वर्षे

2) 75 वर्षे

3) 30 वर्षे

4) 11 वर्षे

उत्तर: 2) 75 वर्षे

 

  1. रवि उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?

1) पश्चिम

2) उत्तर

3) पुर्व

4) दक्षिण

उत्तर:4) दक्षिण


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  RBI Draft Resolution Scheme: Revival & Reconstruction Plan For Yes Bank