रिक्षाचालकाची मुलगी बनली आरटीओ अधिकारी

एका रिक्षाचालकाची मुलगी ते आरटीओ अधिकारी बनली. अमरधाम रोड येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्नेहा चंद्रकांत घटमाळे तरुणीने सिद्ध करून दाखवून दिले. शासकीय अधिकारी व्हायचे, असे ध्येय मनाशी बाळगून स्नेहा घटमाळे हिने तिच्या आयुष्याची सुरवात केली. त्याअनुषंगाने तिने सारडा कन्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढील शिक्षण के. के. वाघ महाविद्यालयात घेत २०२० मध्ये अभियांत्रिकी आणि डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.

२०२० ते २०२१ असे एक वर्ष तिने एका कंपनीत नोकरी केली. दरम्यान, १५ मार्च २०२० ला तिने आरटीओ अधिकाऱ्याची पूर्व परीक्षा दिली. एका वर्षात नोकरी सोडून मुख्य परीक्षेसाठी तिने सराव सुरू केला. २० नोव्हेंबर २०२१ ला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची मुख्य परीक्षा दिली. (ता. २२) मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला.

त्यात स्नेहा एनटीबी महिला आरक्षण वर्गात पहिल्याच प्रयत्नात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावीत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक होण्याचा मान मिळविला. मुख्य परीक्षेसाठी एकूण ५ हजार विद्यार्थी बसले होते. त्यात ६८९ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. २४० रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात आरक्षणानुसार स्नेहा त्या पदावर येत्या काही महिन्यात नियुक्त होणार असल्याची खात्री तिने व्यक्त केली. आई- वडील, भाऊ, बहीण यांचा माझ्या यशामध्ये मोठा वाटा राहिला असल्याची प्रतिक्रिया तिने दिली.

हे पण वाचा :

  • MPSC : जानेवारीत प्रसिद्ध होणार लिपीक-टंकलेखक पदांची जाहिरात ; भरतीबाबतचा नवीन GR
  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती
  • Police Bharti Question Set- 10
  • Police Bharti Question Set- 9
  • Police Bharti Question Set- 8

See also  गोष्ट जिद्दी तरुणाची ! 8वीत सोडली शाळा, नंतर थेट MPSC मध्ये मारली बाजी..