नगराध्यक्ष, सरपंच यांची निवड आता थेट जनतेकडून | Nagar Adhyaksh, Sarpanch election 2022 new rules

Sarpanch election 2022 new rules : महाराष्ट्रातील विकासाचा पाया म्हणजे, नगरपालिका, नगरपंचायतीचे अध्यक्ष व ग्रामपंचायतीचे सरपंच कारण या सर्व स्तरावरूनच ग्रामविकास, नगरपंचायत विकास, नगरपालिका विकास कामे आखली जातात. पण यासाठीसुद्धा ज्या त्या स्तरावर योग्य ती व्यक्ती असणे महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याच वेळेस ग्रामस्तरावर निवडणुका झाल्यानंतर पॅनलमधील मेंबरमार्फत सरपंचाची निवड केली जायची, जी निवड योग्य की अयोग्य ठरविणे थोडे कठीनाच !

वरील सर्व बाबींचा विचार करता, आत्ता नगरपालिका, नगरपंचायतीचे अध्यक्ष व ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवडणूक आता थेट जनतेमधून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामार्फत दिनांक १४ जुलै 2022 दिवशी घेण्यात आला. यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांना मताधिकारही देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

पहिली अडीच वर्ष अविश्वास ठराव नाही

  • थेट निवडून आलेले अध्यक्ष व सदस्याकडून निवडून आलेले उपाध्यक्ष यांचा एकंदरीत कार्यकाल हा पाच वर्षाचा असेल. थेट निवडून आलेल्या अध्यक्ष विरोध पहिल्या अडीच वर्षात कोणत्याही प्रकारचा अविश्वास आणता येणार नाही.
  • सरपंच किंवा उपसरपंचाच्या निवडणुकीच्या दिनांकापासून २ वर्षाच्या काळात व पंचायतीची मुदत समाप्त होण्याच्या ६ महिन्याच्या आत कोणताही अविश्वास ठराव प्रस्ताव आणता येणार नाही.
  • ग्रामसभेमध्ये शिरगतीद्वारे साध्या बहुमताने सरपंचावर अविश्वास प्रस्ताव आणता येईल.

अश्याप्रकारे गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग दोन-तीन निर्णयांचा वर्षाव केला. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळसुद्धा ३ महिने वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळामार्फत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती व उपसभापती या पदांचा कार्यकाल वाढविण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे.

एकंदरीत वरील सर्व बाबीचा विचार केला, तर शासनामार्फत एक चांगलाच निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण गावपातळीवर जनता योग्य त्या व्यक्तीला किंवा सरपंच उमेदवारी थांबलेल्या व्यक्तीला मत देण्याचा प्रयत्न करते; परंतु सदस्यामार्फतची सरपंच निवड यामुळे जनतेला थोडी नाराजगी होती; पण आता या शासननिर्णयामुळे जनतेचा मत योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून तीच व्यक्ती त्या पदावर कार्यरत राहणार आहे; त्यामुळे नक्कीच या निर्णयाचा जनतेमार्फत कुतूहल केलं जाणार आहे.

See also  आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीजपुरवठा भारनियमन बंद, फक्त या जिल्ह्यांचा समावेश