महाराष्ट्रातील 3 महत्वपूर्ण घरकुल योजना, कागदपत्रे, पात्रता, शेवटची तारीख, अर्ज


Gharkul Yojana : महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील व गरजू नागरिकांना आवश्यक असणाऱ्या घरकुल योजनेसाठी अर्ज सुरू असून संबंधित अर्ज लाभार्थ्यांना 31 जानेवारी 2024 अगोदर सादर करण्याचे आवाहन बहुजन कल्याण विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये गरजू नागरिकांसाठी विविध घरकुल योजना राबविण्यात येतात, ज्यामध्ये ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजना, धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना व भटक्या विमुक्त जातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना राबविण्यात येतात.

घरकुल योजना अर्ज प्रक्रिया

नवीन वर्षात ओबीसी समाजातील नागरिकांनी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत, तर धनगर समाजातील लाभार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत तसेच भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांनी यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत 31 जानेवारी 2024 पर्यंत मोठ्या संख्येने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन बहुजन कल्याण विभागाच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.


यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत भटक्या विमुक्त जातीसाठी मागील महिन्यात 15,000 नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली असून धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत 2024 मध्ये पात्र नागरिकांसाठी 25,000 घरकुल देण्याची घोषणा नुकतीच शासनाकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी विहित मुदतीत घरकुलासाठी अर्ज सादर करावा.

घरकुल योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी अर्जदारांचे स्वतःचे मालकी हक्काचे पक्के घर नसावे.
  • लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
  • लाभार्थ्यांकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, लाभार्थ्यांच्या कच्च्या घराच्या ठिकाणी घरकुल मंजूर करून नवीन घर बांधता येईल.
  • लाभार्थी कुटुंबांनी कोणत्याही गृह कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील मागील काही वर्षापासून रहिवासी असावा.
  • लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
See also  Bank Holiday in November 2022 : नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बँका बंद

घरकुल योजना कागदपत्रे

विविध घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करताना लाभार्थी अर्जदारांना आवश्यक अशी घरकुल योजना कागदपत्रे pdf स्वरूपात किंवा झेरॉक्स प्रति स्वरूपात स्वतःकडे बाळगावी लागतील. संबंधित विभागाकडून मागणी केल्यानंतर अर्जदारांना सर्व आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील, थोडक्यात आवश्यक ती कागदपत्रे खालीलप्रमाणे 👇

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • लाईट बिल
  • जॉब कार्ड
  • सातबारा उतारा
  • मालमत्ता नोंदवही
  • ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवही
  • तहसील कार्यालय उत्पन्न दाखला
  • जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत

8 जिल्ह्याची नवीन घरकुल यादी 2023-24 आली ! यादीत तुमचं नाव आहे का ?