पिठाच्या चक्कीसाठी अर्ज सुरू, या लाभार्थ्यांना मिळणार 90 टक्के अनुदान; त्वरित याठिकाणी अर्ज सादर करा


जिल्हा परिषद अंतर्गत नागरिकांना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सेस फंडातून वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून विविध उपकरण अनुदान तत्त्वावर वितरित केले जातात. महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने पिठाच्या चक्कीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले असून या संदर्भातील सविस्तर माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 या चालू वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजनाद्वारे पिठाची चक्की योजना राबवली जात असून यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पिठाच्या चक्कीसह महिलांना पिको फॉल मशीन या उपकरणासाठी देखील अर्ज करता येणार आहे. या योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास लाभार्थ्यांना शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेली आहे, त्यामुळे लाभार्थ्यांनी महिला व बालकल्याण विभाग बुलढाणा या कार्यालयात विहित मुदतीत अर्ज सादर करावा.

सर्वांना प्रश्न पडला असेल ? सदर योजनेचा लाभ कोणाला देण्यात येईल ! तर याठिकाणी पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त आपण महिला व मुलींना अर्ज करता येणार आहे, तर पिको व फॉल मशीनसाठी इतर महिलांनासुद्धा अर्ज करता येईल.

अर्जाची प्रक्रिया 9 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 असेल. यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत. सोबतच अर्जाचा नमुनासुद्धा देण्यात आलेला आहे. अर्ज करताना अर्जदारांना विहित नमुन्यातील अर्ज, शौचालयाबाबतचा ग्रामसेवक दाखला, पंचायत समिती विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र, गट विकास अधिकारी यांचे अभिप्राय प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्र सुद्धा लागतील, याची नोंद अर्जदारांनी घ्यावी.

See also  पोस्टाची जबरदस्त योजना, लाखो रुपये मिळवा | Post Office Gram Suraksha Yojana Maharashtra
  • एका अर्जदारांना एकाचवेळी एक योजनेसाठी अर्ज करता येईल.
  • तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला आवश्यक
  • केवळ ग्रामीण भागातील अर्जदारांना सदर योजनेसाठी अर्ज करता येईल.
  • अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्जदाराचे वय अर्ज करताना 17 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.
  • यापूर्वी अर्जदारांनी 5 वर्षाच्या आत लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदारांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेवर रुजू नसावी.
  • अर्जदारांचा वयाचा दाखला
  • अर्जदारांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • अर्जदारांचा उत्पन्न दाखला
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
  • लाईट बिल झेरॉक्स
  • अर्जदारांचा आधारकार्ड

वरील सर्व आवश्यक कागदपत्रे इतर कागदपत्राची आवश्यकता भासल्यास अर्जदारांना संबंधित कागदपत्र जमा करावी लागतील. तुम्ही जर सदर योजनेसाठी पात्र असाल, तर शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज तुम्ही सादर करणे अनिवार्य आहे.

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
अटी व शर्तीयेथे क्लिक करा

FAQ

1. पिठाची चक्की (गिरणी) योजनेला किती अनुदान आहे?

फ्लोअर मिल म्हणजेच पिठाची चक्की योजनेला 90 टक्के अनुदान आहे.

2. पिठाची चक्की (गिरणी) किंवा फ्लोअर मिल योजनेचा फॉर्म कुठे भरावा?

पिठाची चक्की (गिरणी) किंवा फ्लोअर मिल योजनेचा फॉर्म समाजकल्याण किंवा महिला व बालकल्याण विभागात भरावा.

3. पिठाची चक्की (गिरणी) किंवा फ्लोअर मिल योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे?

पिठाची चक्की (गिरणी) किंवा फ्लोअर मिल योजना फॉर्म बुलढाणा जिल्ह्यासाठी सुरु आहे.