पोस्टाची जबरदस्त योजना, लाखो रुपये मिळवा | Post Office Gram Suraksha Yojana Maharashtra

Gram Suraksha Yojana 2022 : पोस्ट ऑफिसअंतर्गत विविध बचत ठेव योजनेचा लाभ घेऊन आपण लाखो रुपये कमवू शकतो. पोस्ट ऑफिसमधील अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ती योजना म्हणजे Gram Suraksha Yojana होय.

भविष्याच्या सुरक्षेसाठी Saving करणं खूपच महत्त्वाचा आहे. बँक आणि पोस्ट ऑफिसमार्फत बचतीच्या भरपूर अशा सुविधा वेळोवेळी आणल्या जातात. ज्या योजनांचा लाभ घेऊन नागरिक चांगल्यापद्धतीने आपली रक्कम सुरक्षित जमा करुन त्यावर चांगला परतावा ( benefits मिळू शकतात.

ग्राम सुरक्षा योजना काय आहे ? ( Gram Suraksha Yojana )

नुकतीच पोस्ट ऑफिसमार्फत Gram Suraksha Yojana सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी रक्कम जमा करून मोठ्या प्रमाणावर परतावा ( return ) आपल्याला मिळवता येतो. तर चला पाहूयात या संदर्भातील सविस्तर व संपूर्ण माहिती.

ग्राम सुरक्षा योजनेची सुरुवात इंडिया पोस्टमार्फत चालू करण्यात आलेले आहे. ग्रामसुरक्षा योजनेमध्ये कमी गुंतवणूक करून चांगल्या प्रमाणावर परतावा मिळवता येतो. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना दररोज 50 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल. ग्राम सुरक्षा योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका ( Risk ) नाही. हेच या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.

📢 हेसुध्दा वाचा : स्वाधार योजना काय आहे ? त्यासाठीची पात्रता, अटी, शर्ती, व ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती रुपये खर्च करतो. अशा मध्ये रोजची जर फक्त 50 रुपये बचत करून Gram Suraksha Yojana मध्ये गुंतवणूक केल्यास, भविष्यामध्ये आपल्याला लाखो रुपये मिळू शकतात. रोजचे पन्नास रुपये म्हणजेच महिन्याचे 1500 रु. योजनेमध्ये सहभाग घेणाऱ्या धारकांना शेवटी 35 लाख रुपयांची रक्कम प्राप्त होते. ( सूचना : गुंतवणूक करण्यापूर्वी यासंदर्भात तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी नक्की करा. )

See also  MahaDBT : ठिबक, तुषार सिंचन पात्र लाभार्थ्यांची जानेवारी महिन्याची यादी जाहीर, यादी डाऊनलोड करा
योजनेचे नावग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र
कोणामार्फतभारतीय डाक विभाग
अर्ज पध्दतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx
best investment scheme by india post

ग्राम सुरक्षा योजना फायदे

  • गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची 80 वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यास त्यांचे वारसदार गुंतवणूक केलेली रक्कम मिळवू शकतात.
  • खूपच कमी गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा गुंतवणूकदारांना भेटतो.
  • ग्रामसुरक्षा योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका ( Risk ) नाही त्यामुळे दुसऱ्या गुंतवणूक योजनेच्या तुलनेत ही खूपच सुरक्षित योजना आहे.
  • खूपच कमी रकमेपासून गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात.

ग्राम सुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक कोण करू शकतात ?

  • वयाच्या 19 वर्षापासून ते वयाच्या 55 वर्षापर्यंत कोणतेही व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये 10 हजारापासून 10 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते. प्रीमियम रक्कम ( Premium Amount ) सुद्धा तुम्ही तुमच्या मनावर भरू शकता. त्यासाठी 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. मासिक,त्री-मासिक, 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर.
  • या योजनेमध्ये तुम्हाला व्याज सुविधासुद्धा देण्यात येते. योजनेमध्ये कमीत कमी चार वर्षे गुंतवणूक केल्यानंतर व्याज सुविधा ( interest facility ) घेता येते. जर एखादे ग्राहक या योजनेमध्ये 10 लाख गुंतवणूक करतात तर त्यांना 55 वर्षासाठी 1515 रु. दरमहा इतका हफ्ता भरावा लागतो. त्याचप्रमाणे 58 वर्षासाठी 1463 रु. , 60 वर्षासाठी 1411 रु. प्रीमियम ( Premium ) भरावा लागतो.
  • 55 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यानंतर 31.60 लाख रु. , 58 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यानंतर 33.40 लाख रु. , 60 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यानंतर 34.60 लाख रु. इतका मॅच्युरिटी बेनिफिट ( Maturity Benefit ) मिळतो.

Policy बंद करण्याचासुध्दा पर्याय

योजनेमध्ये सतत 3 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना पॉलिसी बंद ( Policy Surrender ) करण्याचा सुद्धा अधिकार आहे. पॉलिसी बंद केल्याने इतर कोणताही फायदा ग्राहकांना दिला जात नाही.

योजनेबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क

तुम्ही पोस्ट ऑफिस संदर्भातील Gram Suraksha Scheme अथवा अन्य योजनेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करून अधिकची माहिती मिळवू शकता. 1800-180-5232/15523