चालू घडामोडी : ०८ मे २०२१

एलिसा कार्सन ठरणार मंगळावर पाऊल टाकणारी पहिली महिलाelisa

आता नासा मंगळावर जाण्यासाठी सर्व तयारी करत आहे. अशा परिस्थितीत एलिसा कार्सन मंगळावर पाऊल ठेवणारी पहिली महिला बनू शकते.
एलिसा कार्सन दीर्घकाळापासून मंगळावर जाण्याच्या या अभियानाची तयारी करत आहे.
नासाची योजना आहे की या दशकाच्या अखेरीस ते मंगळाच्या पृष्ठभागावर पहिल्या मानवाला उतरविणार.
नासा मंगळाच्या पृष्ठभागावर पहिल्यांदा एका महिलेला उतरविणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.
या व्यतिरिक्‍त, ‘आर्टेमिस मिशन’ अंतर्गत 2024 पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर देखील नासा प्रथम महिलेलाच उतरविणारा असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी नासाने अपोलो मिशनला मंगळावर पाठविले होते, ज्यात सर्व अंतराळवीर पुरुष होते.
आता नासाचे ‘आर्टेमिस मिशन’ अंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर प्रथम महिलेलाच उतरविण्याचे उद्दिष्ट आहे. अपोलो हे ग्रीक देवताचे नाव आहे तर आर्टेमिस हे एक ग्रीक देवीचे नाव आहे.

रेल्वेमध्ये 12000 अश्वशक्‍तीच्या वॅग 12 बी रेल्वे इंजिनाचा समावेशरेल्वेमध्ये 12000 अश्वशक्‍तीच्या वॅग 12 बी रेल्वे इंजिनाचा समावेश

भारतीय रेल्वेच्या ताफ्यात 100 वॅग 12000 एचपी डब्ल्यूएजी 12 बी रेल्वे इंजिन समाविष्ट करण्यात आले असून ही देशातील सर्वात शक्‍तिशाली मेड-इन-इंडिया’ इलेक्‍ट्रिक इंजिन्स आहेत.
या इंजिनाचे नाव डब्ल्यूएजी 12 बी असे आहे जे 60100 क्रमांकाचे आहे.
हे इंजिन मधेपुरा इलेक्‍ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे.
ही रेल्वे इंजिन्स आयजीबीटी शैलीवर आधारित 3 फेज ड्राइव्ह आणि 12000 अश्‍वशक्‍ती इलेक्‍ट्रिक इंजिन दर्जाची आहेत.
ही उच्च अश्‍वशक्‍ती असलेली इंजिन्स सरासरी वेग आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची भार क्षमता सुधारून गर्दी असलेल्या रेल्वेमार्गावरील ताण हलका करण्यास मदत करतील.

एमके स्टालिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमानtamilnadu cm

द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईच्या राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टालिन यांना शपथ दिली.
त्यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील ३३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. पक्षाचे नेते दुराई मुरुगन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
एमके स्टालिन यांनी मुख्यमंत्री पदासोबत राज्याचे गृहमंत्री म्हणूनदेखील शपथ घेतली आहे.
याशिवाय त्यांच्याकडे प्रशासकीय आणि पोलीस सेवा, विशेष योजना आणि सार्वजनिक बांधकाम संस्थाच्या कल्याणकारी योजनांची जबाबदारी देखील असेल.
द्रमुकला तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात सहाव्या वेळी सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे.
डीएमके २००६–११, १९९६–२००१, १९८९–९१, १९७१–७६ आणि १९६७–७१ या काळात राज्यात सत्तेत होती.