आयकर विभागात दहावी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, इतका मिळेल पगार

आयकर विभागात काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. आयकर विभाग कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपला अर्ज पाठवायचा आहे.

एकूण जागा : २१

पदाचे नाव :

१) मल्टी टास्किंग स्टाफ- ५ पदे
शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे.

२) टॅक्स असिस्टंट – ११ पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता शिक्षण असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त ८००० शब्द प्रति मिनिटचा डेटा एंट्री स्पीड असणे गरजेचे आहे.

३) स्टेनोग्राफर ग्रेड २ – ५ पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ८० शब्द प्रति मिनिटच्या वेगाने १० मिनिटांची डिक्टेशन आणि इंग्रजीमध्ये ५० शब्द प्रति मिनिट तर हिंदीमध्ये ६५ शब्द प्रति मिनिटच्या वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सक्रिप्शन क्षमता असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा :
सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय १८ वर्षे ते २७ वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

पगार :

मल्टी टास्किंग स्टाफ- ५२०० ते २०,२००/-
टॅक्स असिस्टंट – ५२०० ते २०,२००/-
स्टेनोग्राफर ग्रेड २ – ५२०० ते २०,२००/-

असा करा अर्ज
उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर incometaxindia.gov.in जा. त्यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या ‘व्हॉट्स न्यू’ सेक्शनमध्ये संबंधित जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा.  या लिंकवरुन उमेदवार आयकर विभाग, दिल्ली भरती २०२१ ची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अर्ज करण्यासाठी नमुना फॉर्म जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. हा फॉर्म पूर्ण भरुन, मागितलेली कागदपत्रे सोबत जोडावी.

अर्ज कुठे पाठवायचा?

उमेदवारांनी आपला अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत आयकर उपायुक्त (हेडक्वार्टर-पर्सोनल), रुम नंबर -३७८ ए, सी.आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली – ११०००२१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. यानंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

See also  अहमदनगर महानगरपलिकामध्ये विविध पदांसाठी भरती

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत

फॉर्म व जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा