कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि नोकर भरती २०२२

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “क्लार्क” पदांच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 ऑक्टोबर 2022 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.

भरती पदसंख्या : ४०
सुरवातीस द्यावयाचा पगार : १००००/

पात्रता
1) वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी BCS, BCA, MCA, MBA किंवा प्रथम शाखा श्रेणीतील पदवीधर असणे आवश्यक / पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्यास किमान ५५% गुण असणे आवश्यक.
२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक.
३) प्राधान्य – JAIIB / CAIIB / GDC & A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर.
४) रिक्त पदे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील.
५) वयोमर्यादा : कमाल २५ वर्षे
६) बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
७) उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील स्थानिक असणे आवश्यक

इतर सूचना :
– भरती प्रक्रिया सहकार आयुक्तांचे पॅनेलवरील कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांचेमार्फत राबविली जाणार आहे.

– उमेदवारांनी सुरवातीस फक्त अर्ज (बायोडाटा) [email protected] या ईमेलवर पाठवावेत. सोबत शैक्षणिक व अन्य कागदपात्रांची आवश्यकता नाही. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून पाठवू नयेत. कागदपत्राची पाहणी प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी केली जाईल.

– परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणेत येईल.

– परीक्षा १०० मार्कांची व बहुपर्यायी असणार आहे. पासिंगसाठी किमान ६० मार्क मिळवणे आवश्यक आहे. मात्र मुलाखतीस बोलवताना ६० मार्कावरील गुणवत्ता यादीप्रमाणे प्रथम ६० उमेदवारांनाच बोलविले जाईल. परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण IIBF च्या धरतीवर आधारित आहे. परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे. परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे ब्रॉशर उमेदवारास त्याच्या ईमेल आयडीवर पाठविले जाईल. सबब ईमेल आयडी पाठविताना अचूक पाठवावा. सदर परीक्षेचे आयोजन कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांचे मार्फत संगणक सुविधा असणाऱ्या योग्य अशा ठिकाणी केले जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल.

See also  पोरांनो तयारीला लागा ; राज्यात लवकरच पोलिसांच्या २० हजार पदांची मेगाभरती

– तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल. ऑनलाईन परीक्षेतील मेरीटप्रमाणे ६० उमेदवारांनाच तोंडी मुलाखतीसाठी बोलविले जाईल.

– ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.

– परीक्षेसाठी रु. ७५०/- (जीएसटीसह) या प्रमाणे परीक्षा शुल्क (विना परतीची) आकारले जाणार आहे. उमेदवाराने परीक्षा शुल्क रु. ७५०/- स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या Timber Market, Kolhapur शाखा IFSC CODE: SBIN0005550, MICR Code : 416002008 वर कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; यांचे चालू खाते (Current A/C) क्र. ४०१६८२०८०५७ मध्ये IMPS / NEFT ने अर्जासोबत पाठवावे. रक्कम पाठविताना प्रथम प्राधान्य IMPS ला द्यावे व द्वितीय प्राधान्य NEFT ला द्यावे.

– फी भरल्यानंतर उमेदवाराच्या खात्याला रक्कम डेबिट झालेबद्दल उमेदवाराच्या बँकेकडून आलेला संपूर्ण मेसेज उमेदवाराच्या बायोडाटा मध्ये नमूद असलेल्या ईमेल आयडी वरूनच कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांना [email protected] ईमेल आयडीवर पाठवावा. सदर मेसेज ईमेलद्वारे पाठविला तरच परीक्षेबाबतची माहिती असोसिएशन द्वारे उमेदवाराला कळविली जाईल.

– मागणीनुसार परीक्षा शुल्क न भरल्यास उमेदवारास परीक्षेस बोलविले जाणार नाही.

– मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल. याबाबतचे सर्व अधिकार मा. संचालक मंडळाकडे राहतील.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१/१०/२०२२ रोजी सांयकाळी ६ वाजेपर्यंत राहील.

– या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत असोसिएशन दूरध्वनी क्र. ०२३१-२६२७३०७ /०८ किंवा असोसिएशनचा मोबाईल क्रमांक ८३८००३३१२८ वर संपर्क करावा.

– भरती प्रक्रीये संदर्भातील पुढील अपडेट मिळवणेसाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या : https://kopbankasso.com/
– जाहिरात : येथे क्लिक करा