महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ जाहीर केली आहे. यंदा MAHATET 2021 परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२१ आहे.

त्याचप्रमाणे राज्यात रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या ४० हजार पदांसाठी TAIT परीक्षासुद्धा घेतली जाण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून शासनाकडे वारंवार केली जात आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी सर्व शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

MAHATET 2021 परीक्षेशी संबंधित सर्व माहिती, ऑनलाईन अर्ज करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. टीईटी परीक्षा पेपर १ व २ साठीचे वेळापत्रक, परीक्षा फीस, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आराखडा व संदर्भ पुस्तके यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

MAHA TET 2021 वेळापत्रक 

१.ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
३. टीईटी पेपर १ दिनांक व वेळ – १० ऑक्टोबर २०२१ वेळ सकाळी १०.३० ते १.००
४. टीईटी पेपर २ दिनांक व वेळ – १० ऑक्टोबर २०२१ वेळ दुपारी २.०० ते ४.३०

परीक्षा शुल्क

१. सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. – ५०० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ८०० रुपये (दोन्ही पेपर)
२. अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग – २५० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ४०० रुपये (दोन्ही पेपर )

MAHA TET परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका आराखडा,अभ्यासक्रम व तयारी

(1)TET पेपर 1 अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तके

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.

See also  NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे या पदांसाठी भरती

2.मराठी भाषा(30 गुण)

यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

4.गणित (30 गुण)

यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

5.परिसर अभ्यास (30 गुण)

यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.