संरक्षण मंत्रालय अंतर्गत मुंबई येथे भरती ; असा करा अर्ज

संरक्षण मंत्रालय मुंबई इथे वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदभरतीबद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया.

पदाचे नाव : 

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) – एकूण जागा 13

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे फिजिक्स, केमेस्ट्री किंवा इतर विषयांमध्ये B.Sc. ची पदवी असणं आवश्यक आहे. तसंच जाहिरातीत देण्यात आलेल्या काही क्षेत्रांमध्ये कमीतकमी दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचं वय हे तीस वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. त्यावरील आयुच्या उमेदवारांना या पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

कशी होणार निवड

या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीनं पार पडणार आहे. त्यासाठी दहा मार्कांचं इंग्रजी, Aptitude दहा मार्कचं, दहा मार्कांचं Reasoning, वीस मार्कांचं विज्ञान तर पन्नास मार्कांचं फिल्ड किंवा ट्रेड्शी संबंधित प्रश्न असणार आहेत.

पगार : ३५,४०० ते १,१२,४०० /-

अशा पद्धतीनं करा अप्लाय

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एका चांगल्या प्रतीच्या कागदावर संपूर्ण अप्लिकेशन लिहून दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे. हा कागद व्यवस्थितपणे एका लिफाफ्यामध्ये ठेऊन त्यावर ज्या पदासाठी अर्ज करू इच्छित आहोत त्या पदाचं नाव लिहायचं आहे. हा लिफाफा संबंधित दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पाठवायचा आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वेटीवर, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2021

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

See also  JIPMER मध्ये 433 जागांसाठी भरती