MPSC : संयुक्त पूर्व परीक्षा 2021 : 666 पदे (मुदतवाढ)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 जाहीर केली आहे. त्यानुसार आयोगाकडून एकूण ६६६ जागांसाठीची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आली. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२१  ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे.

एकूण जागा :- ६६६

पदांचे नाव :-
सहायक कक्ष अधिकारी, गट ब– १०० पदे
राज्य कर निरीक्षक, गट ब – १९० पदे
पोलीस उप निरीक्षक, गट ब-  ३७६ पदे

शैक्षणिक पात्रता :-
– सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
– पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
– अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे.
-मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वय-
1.सहायक कक्ष अधिकारी – 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
2.राज्य कर निरीक्षक – 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
3.पोलीस उप निरीक्षक- 19 ते 31 [मागासवर्गीय: 03 वर्षे सूट] +

परीक्षा फी : अमागास- 374/ मागासवर्गीय- 274/-

वेतन श्रेणी : ३८,६०० ते १,२२,८०० अधिक महागाई भत्ता व निहायमाप्रमाणे देय इतर भत्ते

शारीरिक मोजमापे/अर्हता :

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे :

पुरुष :

(१) उंची १६५ सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)

(२) छाती – न फुगविता ७९ से.मी. फुगविण्याची क्षमता किमान ५ से.मी. आवश्यक

See also  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 25 सप्टेंबर 2022

महिला : 

– उंची १५७ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीकरीता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारिरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिका याकडून तपासून घेण्यात येतील. वरीलप्रमाणे विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : २९ ऑक्टोबर २०२१ पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ नोव्हेंबर २०२१  ३० नोव्हेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा