राज्यसेवा २०२१ : चालू घडामोडी

MPSC Rajyaseva Current Affairs 2021

MPSC Rajyaseva Current Affairs – चालू घडामोडींचे, Rajyaseva 2021 – राज्यसेवा परीक्षेत अनन्यसाधारण महत्व आहे. मागील पाच वर्षांचे विश्लेषण केले असता चालू घडामोडींवर असलेला आयोगाचा भर आपल्या लक्षात येईल.

GS -I मध्ये चालू घडामोडींवरील प्रश्नांकडे ज्यादा गुण देणारे प्रश्न म्हणून बघितले जाते. ज्यामुळे आपण GS -I मध्ये Score वाढवू शकतो. याच अनुषंगाने या लेखात विश्लेषण केले आहे. यात सध्याचा Trend अभ्यासाचे स्त्रोत आणि उपयोगी सूचनांचा समावेश आम्ही करत आहोत.

सध्या चालू असलेला Trend ?

वर्ष२०१५२०१६२०१७२०१८२०१९
चालू घडामोडीवरील प्रश्नसंख्या२२२७१५१४२१

प्रश्‍नांचा Pattern आणि विशेष मुद्दे

MPSC Rajyaseva Current Affairs – सर्वसाधारणपणे 4 विभागात चालू घडामोडीवर प्रश्‍न विचारलेले आहेत.

1) Syllabus – आधारित (विषयांनुसार)
2) आंतरराष्ट्रीय घटना
3) राष्ट्रीय घडामोडी
4) स्थानिक/ महाराष्ट्र संबंधी घटना
5) Off-bit प्रश्‍न


1) विषयनिहाय प्रश्‍न / Syllabus आधारित प्रश्‍न

या प्रकारात सर्वसाधारण भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण इ. विषयांचे वर्षेभरात झालेले संशोधन, घटना, पुरस्कार, व्यक्तिविशेष
(उदा.इतिहासकार, समाजसेवक यावर आधारित प्रश्‍न असतात.

उदा.
1) बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (2012-17) मुख्य उद्दिष्ट कोणते होते? (राज्यसेवा पूर्व-2018)
1) आर्थिक वृद्धी व स्थिर विकास साधणे
2) जलद वृद्धी व विकास साधणे
3) जलद व अधिक सर्वसामावेशक विकास साधणे
4) जलद, अधिक व सर्वसामावेशक विकास साधणे

See also  बँक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत 551 जागांसाठी भरती, पदवीधरांसाठी संधी…

2017-18 हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे शेवटचे वर्ष असल्याने राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राशी संबंधित हा प्रश्‍न चालू घडामोडींना अनुसरुन विचारण्यात आला होता.

2) आंतरराष्ट्रीय घटना

ज्या घटनांचा भारतावर वा जगावर दुरगामी परिणाम झाला किंवा होत आहे किंवा होऊ शकेल, अश्या घटनांवर संबंधित व्यक्तिंवर
(उदा. नोबेल विजेते) प्रश्‍न विचारले जातात.

उदा .
1) संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे खालील कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे? (राज्यसेवा पूर्व – 2018)
1) 1 जून
2) 5 जून
3) 1 सप्टेंबर
4) 16 सप्टेंबर

2018 मध्ये ओझोन आणि Montreal करार चर्चेत असल्याने हा प्रश्‍न विचारण्यात आला.

3) राष्ट्रीय घडामोडी

या प्रकारात देशपातळीवरली सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरणीय घटनांवर प्रश्‍न विचारले जातात
यात व्यक्ति, क्रीडा, पुरस्कार, सरकारी योजनांचा समावेश असतो.

उदा.
1) वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जन-धन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरु करण्यात आली? (राज्यसेवा पूर्व 2019)
1) 16 मे 2014        
2) 15 मे 2014           
3) 28 ऑगस्ट 2014        
4) 18 नाव्हेंबर 2014

जनधन योजनेला मिळालेला प्रतिसाद आणि यश यामुळे ही योजना चर्चेत होती. या पार्श्‍वभूमिवर हा प्रश्‍न विचारला गेला.

4) स्थानिक / महाराष्ट्रसंबंधीत

यात महाराष्ट्रातील घडामोडी उदा. कृषी, पुर, विविध योजना, लोकसंख्या इ. वर भर देण्यात येतो.
(यात रस्ते, नदी, पठार, वने, संदीघेत क्षेत्र, वारसा स्थळे इ. समाविष्ठ असतात.

उदा.
1) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर एकाही महामार्गावर नाही? (राज्यसेवा पूर्व 2016)
1) चाळीसगाव     
2) धुळे       
3) संगमनेर        
4) औरंगाबाद

5) Off bit प्रश्‍न

हे प्रश्‍न अचूक माहिती असल्याखेरीज Attempt करु नये.

उदा. 1) कोणत्या हरणाने रामायणातील सितेला भुरल पाडली? (राज्यसेवा 2016)
1) कस्तुरी मृग         
2) काळवीट     
3) चितळ       
4) चिकास

वरील विश्‍लेषणावरुन आपणास कुठल्या बातम्या वाचाव्या अथवा वाचू नये हे लक्षात येईल.

See also  AOC Recruitment : आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये 3068 जागांसाठी बंपर भरती


Sources/स्त्रोत (MPSC Rajyaseva Current Affairs)

(1) News Papers : 1) लोकसत्ता / 2) महाराष्ट्र  टाईम्स
(२) मासिक / Month : (1) परिक्रमा (पृथ्वी) / (2) Unique Bulletin / (3) MPSC Simplified
(3) वार्षिक : 1) सकाळ वार्षिकी / 2) परिक्रमा Compilation / 3) MPSC Simplified
(4) Online : Mission Mpsc Daily Website.

 

Conclusion

वरील विश्‍लेषणावर आधारित अभ्यासाची दिशा ठरविल्यास MPSC Rajyaseva Current Affairs – चालू घडामोडी अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासता येईल. या बरोबरच प्रश्‍नांचा सरावही तितकाच महत्वाचा आहे. त्यासाठी आपण Mission MPSC प्रश्‍नवेध ला सोडवू शकतात. तसेच विविध मासिके सोडवू शकता.

आपणा सर्वांना राज्यसेवा पूर्व 2021 साठी शुभेच्छा…!

टीम मिशन एमपीएससी