Weather forecast : पंजाबराव ढख यांचा आजचा हवामान अंदाज ? थंडी वाढणार ! हरभरा, गहू पोषक वातावरण इत्यादी

Weather forecast : नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ व अंदाजक पंजाबराव डख साहेब यांच्यामार्फत नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला असून या हिवाळी वातावरणात थंडी किती असेल ? विविध पिकांसाठी जशाप्रकारे हरभरा, गहू पिकासाठी पोषक वातावरण असेल का ? या संदर्भातील महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दलची थोडक्यात व कामाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून याठिकाणी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आज 10 डिसेंबर 2023 या तारखेपासून महाराष्ट्रमध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. दिवसेंदिवस हा थंडीचा उतारा वाढत राहणार आहे, ही बाब शेतकऱ्यांनी व जनसामान्य नागरिकांनी लक्षात घ्यावी. आता चालू झालेली थंडी जवळपास पुढील 15 दिवसांसाठी सतत असेल, म्हणजेच पुढील पंधरा दिवस वातावरण कोरड राहणार आहे, ही बाब नागरिकांनी लक्षात घ्यावी. थंडी साधारणता 25 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या हरभरा व अन्य पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या शेतामध्ये पेरणी केलेले नसेल, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, मागील पावसाचा ओलावा व चालू झालेल्या थंडीचा आधार घेऊन शेतकरी हरभरा पेरणी शकतात; कारण यासाठी सध्या पोषक वातावरण आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुमार पेरणीसुद्धा करता येईल.


या शेतकऱ्यांच्या शेतात अद्याप पेरणी झालेली नसेल म्हणजेच शेत निरंक असेल, तर अशा शेतकऱ्यांना ज्वारी, नसा व हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. अशा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. याचप्रमाणे गहू पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे. त्यांनासुद्धा पोषक वातावरणामुळे गव्हाची पेरणी करता येणार आहे.

विविध सरकारी योजनांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा


See also  Mahajob Portal 2021: Online Registration at mahajobs.maharashtra.gov.in