असं करा मतदानकार्डला आधारकार्डशी लिंक | link voter card to aadhar card online in marathi

link voter card to aadhar card : प्रत्येक जिल्ह्यात मतदारांकडून आधार कार्ड संग्रहित करण्याचा कार्यक्रम किंवा मोहीम १ ऑगस्ट 2022 ते १ एप्रिल 2022 या कालावधीत राबविले येणार असून याबाबतची पहिली विशेष मोहीम 4 सप्टेंबर 2022 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मतदानाच्या पारदर्शकतेला सहयोग करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंकरकर यांनी केले आहे.

मतदानकार्ड आधारकार्डला ऑनलाईन पद्धतीने लिंक करण्याची सुविधा

नागरिकांच्या सोयीसाठी मतदारांना आता ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब ऑनलाइन अधिकृत पोर्टलवरतीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच अर्ज क्र. ६ ब च्या छापील प्रतीसुद्धा संबंधित बीएलओ यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल किंवा ॲपच्या मदतीनेसुद्धा मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. ६ ब वरून आपला आधार क्रमांक मतदान कार्डशी लिंक करू शकतील आणि युआयडीएआयकडे नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरण करू शकतील.

अर्ज क्र. ६ ब पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आधारकार्ड नसेल तर तात्पुरत्या स्वरूपात हे लिंक करा

भविष्यात नागरिकांना अधिक चांगली व पारदर्शक निवडणूक सेवा प्रदान करण्यासाठी मतदान कार्डला आधारकार्ड लिंक करण्याचे काम सुरू आहे. जर, मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्या कारणामुळे त्याचा किंवा तिचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल; तर मतदाराला खालीलप्रमाणे नमुना अर्ज क्र. ६ ब मध्ये नमूद केलेल्या ११ पर्यायी कागदपत्रापैकी कोणताही एक कागदपत्र सादर करावा.

  • भारतीय पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मनरेगा जॉबकार्ड
  • फोटोसहीत बँकेचा पासबुक
  • हेल्थ इन्शुरन्स स्मार्टकार्ड
  • पेन्शन डॉक्युमेंट्स
  • अधिकृत ओळखपत्र एमपी, एमलए इत्यादींसाठी
  • सर्विस आयडेंटिटी कार्ड काही मोजक्या कंपन्यांसाठी
  • युनिक आयडेंटिटी कार्ड ( UDID)
See also  Loan Waiver : 50 हजार अनुदान पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

आधार संकलनाची कार्यपद्धत

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम 23 मधील तरतुदीनुसार मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी मतदान नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 व मध्ये नमुना अर्ज क्र. ६ ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. ६ ब भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध असेल.

मतदानकार्डला आधारकार्ड ऑनलाईन लिंक कसे करावे ? ( how to link voter card to aadhar card online ? )

  • मतदारकार्डला आधारकार्ड लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच nvsp.in यावरती यायचा आहे.
  • वेबसाईटवर आल्यानंतर मतदार नवीन असेल तर नोंदणी करून घ्यायचे आहे, त्यानंतर पुढील प्रक्रिया करायची आहे.
  • मतदारांनी नोंदणी केल्यानंतर लॉगिन करण्यासाठी ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.
  • लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूस information of Aadhar number by existing electors या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर विविध अर्जाचे नमुने दिसतील. जशाप्रकारे Form6, Form6A, Form 6B, Form7, Form8 इत्यादी.
  • Form 6B हा फॉर्म open करून तुमचा आधारकार्ड नंबर टाकून अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक application reference number भेटेल, तो reference number तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे. त्या reference number च्या मदतीने तुमच्या अर्जाची सध्या स्थिती तुम्ही पाहू शकता.

मतदानकार्डला आधारकार्ड ऑनलाईन पद्धतीने कसा लिंक करावा ? सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पहा 👇👇

आता मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करा | How to link voter card to aadhar card online in marathi 2022 | BY Marathi Updates