ई पीक पाहणी नवीन ॲप Version 2.0 नवीन सुधारणा | e peek pahani version 2 apk download

e peek pahani version 2 : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता e-peek pahani version 2.0 लाँच करण्यात आला आहे. उद्या एक ऑगस्ट 2022 दिवशी या नवीन ॲप्लिकेशनची सुरुवात होणार आहे. तर e-peek pahani version 2.0 मध्ये काय महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0 मधील नवीन सुधारणा ( e peek pahani version 2 new features )

1. Geo Fencing सुविधा

नवीन सुधारित ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्येबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा शेतकरी ई-पीक पाहणी करतील तेव्हा पिकाचा फोटो काढताना फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपासूनचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी ई-पीक पाहणी आपल्या गटापासून दूर अंतरावर करत असतील; तर त्यासंदर्भात तसा संदेश त्यांना त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्यात येईल. या सुधारणेमुळे पिकाचा अचूक फोटो काढण्यात आलेला आहे का नाही ? हे निर्धारित करण्यात येणार आहे.

2. ई-पीक पाहणी शेतकऱ्यांद्वारे स्वयंघोषित

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पीक नोंदणी करत असताना शेतकऱ्यांकडून स्वयंघोषणापत्र घेतले जाणार असून अशाप्रकारे शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल आणि त्याची नोंद गाव नमुना नंबर 12 वरती करण्यात येईल.

3. फक्त 10% तपासणी तलाठी यांच्यामार्फत

शेतकऱ्यांनी केलेल्या ई-पीक पाहणी पैकी 10% पडताळणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात येईल. ज्यामध्ये पिकांचे फोटो नसलेल्या नोंदी, चुकीच्या फोटो असलेल्या नोंदी व मर्यादेच्या बाहेरील अंतरावरून पिकाचा फोटो काढलेल्या नोंदी इत्यादी नोंदीचा प्रवेश यामध्ये असणार आहे. तलाठ्यांमार्फत या नोंदीमध्ये आवश्यकता असल्यास दुरुस्ती करून सत्यापित करण्यात येतील व गाव नमुना नंबर 12 वरती त्याची नोंद घेतली जाईल.

See also  घोणस अळी नियंत्रण, काळजी, सूचना माहिती | Ghonas Ali Information in Marathi

4. 48 तासात स्वतः पीक पाहणी दुरुस्ती

शेतकऱ्यानी एकदा ई पीक पाहणी नोंदविल्यानंर 48 तासाच्या आत त्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःहून बदल करता येणार आहे; परंतु ई पीक पाहणी करून 48 तास पूर्ण झाल्यास त्यानंतर शेतकऱ्यांना त्यामधे कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.

5. किमान आधारभूत किंमत ( MSP ) संमती

ई पीक पाहणी करताना आता शेतकऱ्यांना e peek pahani version 2 मध्ये एक नवीन सुविधा देण्यात आले आहे. ती म्हणजे किमान आधारभूत किंमत हा ऑप्शन जर पीक पाहणी करताना शेतकऱ्यांनी निवडला तर ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ही माहिती पुरवठा विभागाकडे पाठविली जाईल. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी रांगेत जाऊन उभारण्याची आवश्यकता नाही.

6. मिश्र पिकामध्ये मुख्य पिकासह 3 घटक नोंद सुविधा

मागील ई पीक पाहणी ॲपमध्ये मुख्य पीक व दोन पिके नोंदविण्याची सुविधा होती. पण आता नवीन ई पीक पाहणी ॲप ( e peek pahani version २ ) मध्ये एक मुख्य पीक व तीन दुयम पीक नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. सोबतच लागवड दिनांक, क्षेत्र, हंगाम नोंदविण्याची सुविधा देण्यात आले आहे, यामुळे दुयम पिकाची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

ई पीक पाहणी व्हर्जन २ इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.

e peek pahani version 2 with new features for farmer

7. संपूर्ण गावाची पीक पाहणी यादी पाहता येणार

ई पीक पाहणी ॲप 2.0 ( e peek pahani version 2 ) मध्येच गावातील संपूर्ण शेतकऱ्यांची यादी पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याद्वारे खातेदारांना ई पीक पाहणीमध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास मुदतीमध्ये तलाठी यांना संपर्क करायचे आहे.

8. ई-पीक पाहणी ॲप व्हर्जन 2 हेल्प सुविधा

e peek pahani app version 2 मध्येच आता मदत ऑप्शन देण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करत असताना येणाऱ्या सर्व अडचणीचे निराकरण देण्यात आले आहे. म्हणजेच प्रश्न आणि उत्तर देण्यात आले आहेत. तसेच ऑडियो, व्हिडिओ क्लिप्ससुद्धा देण्यात आल्या आहेत. ज्याच्या मदतीने शेतकरी ई पीक करताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील.

See also  महाराष्ट्रातील 3 महत्वपूर्ण घरकुल योजना, कागदपत्रे, पात्रता, शेवटची तारीख, अर्ज

9. ॲपबाबत मत व रेटिंग नोंदविण्याची सुविधा

ई पीक पाहणी व्हर्जन 2 ( e peek pahani version 2 ) मध्ये वापरकर्त्यांना ॲपबाबत मत व रेटिंग नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

10. खाता अपडेट करण्याची सुविधा

पीक पाहणी हंगाम सुरु असताना जर तुम्ही 7/12 वर फेरबदल केले असल्यास खाता अपडेट करण्याची सुविधासुद्दा देण्यात आले आहे.

11. तलाठी स्तरावर पीक पाहणी नोंदविताना मागील हंगामाची पीक पाहणी कायम ठेवण्याची सुविधा.

12. एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना एकापेक्षा जास्त गट क्रमांक निवडून एकच वेळी नोंदविण्याची सुविधा.

शेतकऱ्यांनी करावयाच्या ई पीक पाहणीचा कालावधी

हंगामकालावधी
खरीप१ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर
रब्बी१५ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी
उन्हाळी१५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल

तलाठ्यांनी करावयाच्या ई पीक पाहणीचा कालावधी

हंगामकालावधी
खरीप१६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
रब्बी१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी
उन्हाळी१६ एप्रिल ते २८ मे

टीप : काही कारणात्सव अडचण झाल्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात येते त्यामुळे कालावधीमध्ये जेमतेम मागेपुढे फरक पडू शकतो.

ई-पीक पाहणी अनिवार्य आहे का ?

हो, कारण ई-पीक पाहणीशिवाय आपला सातबारा पूर्ण होणार नाही म्हणजेच आपल्या शेतातील पिकाची नोंद ७/१२ वर केली जाणार नाही.

ई पीक पाहणी नवीन अँप कुठून डाउनलोड करावे ?

नवीन ई पीक पाहणी अँप व्हर्जन 2 तुम्ही playstore किंवा epeek.mahabhumi.gov.in या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.

ई-पीक पाहणी करण्यासाठी शेवटची दिनांक काय आहे ?

खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी अंतिम मुदत टप्पा १ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबरचा आहे.