आता बागायती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मदत हेक्टरी 27 हजार रु. | Bagayati Pik Nuksan Bharpai Madat 2022

Bagayati Pik Nuksan Bharpai Madat 2022 : अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय 12 ऑगस्ट 2022 दिवशी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला होता. यापूर्वी ही नुकसान भरपाई एनडीआरएफच्या ( NDRF – National Disaster Response Force) माध्यमातून 6 हजार 800 रु. दिली जायची; परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान पाहता, ही नुकसान भरपाई खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान भरून न येण्यासारखे होते. याच गोष्टीचा विचार करता नव्याने गठीत झालेल्या सरकारने अतिवृष्टीग्रस्त ( पूरग्रस्त ) शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रु. म्हणजेच दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला होता.

Bagayati Pik Nuksan Bharpai Madat 2022 (Maharashtra)

पण; त्यामध्ये अद्याप बागायती शेतकऱ्यांना दर हेक्टरी किती मदत दिली जाईल ? यासंदर्भात कोणतेही भाष्य किंवा निर्णय देण्यात आलेले नव्हते; पण कालच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये म्हणजेच 16 ऑगस्ट 2022 दिवशी जिरायती ( कोरडवाहू ) शेतीसोबतच बागायती शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीत हेक्टरी 27 हजार रु. मदत देण्यात येईल याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे सरकारमार्फत घेण्यात आला. ही वाढीव मदत 3 हेक्टरपर्यंत मर्यादित असेल.

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत जमा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अतिवृष्टीच्या नुकसानीचे जवळपास ९५ टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. काहीठिकाणी तक्रारी होत्या त्यासुध्दा टीममार्फत दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नका. लवकरच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल.

लोकमत न्यूज पेपर

बागायती पीक नुकसान भरपाई मदत महाराष्ट्र 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” एनडीआरएफच्या निकषानुसार जिरायती शेतीसाठी हेक्टरी 6,800 रुपये मदत दिली जाते. महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून 10,000 रुपये हेक्टरी मदत देऊन, ती मर्यादा 2 हेक्टरपर्यंत ठेवली होती. आम्ही ती दुप्पट करून 13,600 रुपये हेक्टरी मदत तीसुध्दा तीन हेक्टरपर्यंत देणार आहोत. त्याचसोबत बागायती शेतीसाठी आधीच्या 15 हजार रुपयांऐवजी 27 हजार रुपये हेक्टरी मदत तीन हेक्टरपर्यंत दिली जाईल. “

See also  Low Interest Home Loan Banks in Maharashtra | या बँकेत 7 टक्क्यापेक्षा कमी व्याज दराने गृहकर्ज

त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांसाठी पूर्वी 25 हजार रुपये हेक्टरी मदत दिली जायची, पण त्याऐवजी आता 36 हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाईल. म्हणजेच 1 लाख 8 हजार रुपयापर्यंतची मदत शेतकऱ्यांना या वाढीव निर्णयामुळे मिळणार आहे.

वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ मदत खालीलप्रमाणे असेल.

लागवड जमीनपूर्वीची मदतवाढीव मदत
जिरायत६ हजार ८०० रु. प्रति हेक्टर१३ हजार ६०० रु. प्रति हेक्टर
बागायत१५ हजार रु. प्रति हेक्टर२७ हजार रु. प्रति हेक्टर
बहुवार्षिक पीक२५ हजार रु. प्रति हेक्टर३६ हजार रु. प्रति हेक्टर
बागायती पीक नुकसान भरपाई मदत यादी 2022

वरील सर्व लागवड जमिनीसाठी क्षेत्र मर्यादा ३ हेक्टरपर्येंत असेल.