Low Interest Home Loan Banks in Maharashtra | या बँकेत 7 टक्क्यापेक्षा कमी व्याज दराने गृहकर्ज

Low Interest Home Loan Banks in Maharashtra : भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर असावं. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बँका आणि हाउसिंग फायनान्स कर्जदारांना खूप मदत करतात. पूर्वीच्या तुलनेत सध्या गृहकर्ज फार कमी व्याज दरावर उपलब्ध होत आहेत. आजच्या लेखामध्ये आपण अशाच 7 बँकाबदल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये आपल्याला खूप कमी व्याजदरावर गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Top 7 Home Loan Low Interest Bank List

रिझर्व बँकेमार्फत वेळोवेळी व्याजदर मध्ये बदल केले जातात. मागील दोन महिन्यातच रिझर्व बँकेद्वारे 0.90 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे बँकांनी वित्तीय कंपन्यांनी गृहकर्जाचा व्याजदर वाढविला आहे. असे असले तरी मार्केटमध्ये बऱ्याच बँकांमार्फत सात टक्केपेक्षा कमी दराने गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाते.

गृहकर्ज घेताना या गोष्टी लक्षात असू द्या

  • कर्ज हस्तांतरित करण्यासाठी लागणारा जो खर्च आहे त्यावर कर्ज घेण्यापूर्वी विचार करा. कारण, कर्ज मुदतीपूर्वी बंद केल्यास अनेक बँका वेगवेगळे शुल्क आकारतात. प्रशासन-प्रक्रिया शुल्कासह इतर सुद्धा शुल्क लागते. त्यामुळे त्याचे योग्य विश्लेषण करा.
  • कर्ज प्रक्रिया सुरुवात केल्यानंतर बँका व वित्तीय संस्था आपले ग्राहक सहजासहजी सोडत नाहीत. त्यामुळे तुमच्या चालू असलेल्या बँकेमध्ये व्याजदराबाबत अधिकची चौकशी करू शकता. बँकेने जर कर्जदर कमी केला तर तुम्हाला कर्ज हस्तांतरण करण्याची आवश्यकताच भासणार नाही.
  • तुम्ही कर्जाची मोठी रक्कम परतफेड केलेली असेल, व थोडीशी रक्कम शिल्लक असेल तर अशावेळी तुम्हाला कर्ज हस्तांतरण करणे महाग पडू शकते. कारण दोन ते तीन वर्षांपूर्वी घेतलेलेच कर्ज हस्तांतरित करायला परवडण्याजोगे असते.

गृहकर्ज ई-एमआय व्यवस्थापन ( House Loan EMI Best Management )

ज्या ग्राहकांनी अधीच गृहकर्ज ( House Loan ) घेतलेले असेल, अधिक व्याजदरामुळे जर त्यांना गृहकर्जाचा मोठा हप्ता भरावा लागत असेल, तर ते आपले गृहकर्ज स्वस्त दराने कर्ज देणाऱ्या बँकेत हस्तांतरित करू शकतात. केवळ हफ्ता कमी करण्यासाठीच म्हणून नव्हे तर, परतफेडच्या अटीत सुधारणा करण्यासाठी व अधिक चांगल्या सेवेसाठी तुम्ही कर्ज हस्तांतरणाचा पर्याय वापरू शकता.

See also  पीएम किसान योजना ई-केवायसी करा , नाहीतर सहा हजार बंद | Pm Kisan Yojana ekyc Date Extended

खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या १० बँका ज्यांच्यामार्फत सध्या स्थितीमध्ये कमीत कमी व्याजदरामध्ये गृहकर्ज उपलब्ध करून दिले जातील.

आयडीएफ़सी6.50 ते 7.80
एलआयसी फायनान्स6.90 ते 7.80
पीएबी बँक6.80 ते 8.05
बँक ऑफ बडोदा6.90 ते 8.80
बँक ऑफ इंडिया6.90 ते 8.60
अक्सिस बँक7.00 ते 7.30
कॅनरा बँक7.05 ते 9.25
एसबीआय बँक7.55 ते 8.05
एचडीएफसी बँक7.55 ते 8.05
आयसीआयसीआय बँक7.60 ते 8.10