‘कुक्कुटपालन’ साठी अनुदान सुरू जिल्हानिहाय लाभार्थी व अनुदान | Kukut Palan Yojana Maharashtra 2022

Kukut Palan Yojana Maharashtra 2022 : शेतकऱ्यांना शेतीसोबतच इतर व्यवसाय करूनसुद्धा चांगला उत्पन्न मिळवता यावा. या अनुषंगाने शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात व त्या उपक्रमांतर्गत अनुदान दिले जाते. तर अशाच प्रकारची योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना ( Kukut Palan Yojana 2022 ). शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन केले जावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून 1 हजार कुक्कुटपालन मासल पक्षांचे संगोपन करण्याची नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील 2278 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या लाभापोटी 33 कोटी 43 लाखाचे अनुदान देय असणार आहे.

या संदर्भातील जिल्हानिहाय आराखडासुद्धा तयार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते. अनुदान देण्यासाठी यंदा मागील वर्षापेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लाभार्थी संख्या अधिक आहे.

Kukut Palan Yojana Maharashtra 2022

या योजनेतून अनुदान मिळावे यासाठी दरवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांकडून अर्ज केले जातात आणि मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते. गेल्या वर्षी जवळपास लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. गेल्या वर्षीपासून ऑनलाईन अर्ज करण्याला सुरुवात झाली. तेच अर्ज 5 वर्ष चालेल. या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 1 लाख 12 हजार 500 रुपये तर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना 1 लाख 68 हजार 750 रुपये दिले जात आहे. Kukut Palan Yojana लाभार्थी निवड सोडत पद्धतीने केली जाते.

जिल्हानिहाय लाभार्थी संख्या व एकत्रित अनुदान खालीलप्रमाणे असेल

जिल्हालाभार्थी संख्याअनुदान
ठाणे२८३८ लाख २७ हजार
पालघर२५२९ लाख ७७ हजार
रायगड३६४७ लाख १३ हजार
रत्नागिरी३०३९ लाख ९१ हजार
सिंधदुर्ग३०२७ लाख २८ हजार
पुणे१२०१ कोटी ८२ लाख ८० हजार
सातारा८११ कोटी १६ लाख ९६ हजार
सांगली७७१ कोटी १३ लाख ४ हजार
सोलापूर११२१ कोटी ८५ लाख ९७ हजार
कोल्हापूर१०४१ कोटी ५४ लाख १६ हजार
नाशिक९४१ कोटी २९ लाख ३३ हजार
धुळे३६४९ लाख ७३ हजार
नंदुरबार२६३१ लाख ८३ हजार
जळगाव९२१ कोटी ३० लाख ९२ हजार
नगर१३४१ कोटी ९७ लाख ६० हजार
अमरावती९११ कोटी ३८ लाख २७ हजार
बुलढाणा१०२१ कोटी ५६ लाख ६७ हजार
यवतमाळ७७१ कोटी १३ लाख ४७ हजार
अकोला६३९७ लाख १० हजार
वाशीम५१६४ लाख १९ हजार
नागपूर६६९७ लाख १५ हजार
भंडारा४३६४ लाख १९ हजार
वर्धा३४५० लाख १४ हजार
गोंदिया३७६० लाख १५ हजार
चंद्रपूर५६८० लाख १ हजार
गडचिरोली३३४३ लाख ३५ हजार
औरंगाबाद७६१ कोटी १० लाख ९१ हजार
जालना६५९६ लाख ४५ हजार
परभणी५०७६ लाख ५६ हजार
बीड८२१ कोटी २० लाख ८२ हजार
लातूर९४१ कोटी ४५ लाख ५६ हजार
उस्मानाबाद६१९१ लाख ६० हजार
नांदेड१२३१ कोटी ८७ लाख ६२ हजार
हिंगोली६६६६ लाख ८२ हजार
मर्यादा वाढविण्याची गरज : हीच कुकुटपालन योजना अन्य विभागामार्फत राबविली जात होती. त्यात पक्ष्यांची संख्या आणि अनुदान अधिक होते. पूर्वीच्या प्रमाणात आता ते कमी करण्यात आले असल्याकारणाने कुकुटपालनाकडे कमी-जास्ती का होईना ! पण लाभार्थी दुर्लक्ष्य करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता मर्यादा वाढवली तर मर्यादेसोबत लाभार्थीसुद्धा वाढतील.
See also  KYC करा नाहीतर बँक खात्यातून पैसे काढता येणार नाहीत | Bank Kyc is Mandatory for Withdrawing Amount from Account