KYC करा नाहीतर बँक खात्यातून पैसे काढता येणार नाहीत | Bank Kyc is Mandatory for Withdrawing Amount from Account

Bank Kyc in marathi : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यामध्ये विविध महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. याच अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी शासनाकडून वाढीव दराने दर हेक्टरी मदतसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे.

शासनाकडून सहानुभूतीपूर्वक विचार करून मदतीच्या निधीला मंजुरी सुद्धा मिळाली आहे त्यामुळे लवकरच शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त होण्याची शक्यता असून हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यावर तो तालुक्याला पाठवला जाईल व त्यानंतर नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात (Bank Account) शासकीय मदतीची रक्कम जमा होणार आहे.

राज्यातील नुकसानग्रस्त आणि शासकीय मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला आधारकार्ड अपडेट करून वेळीच बँकेमध्ये केवायसी करून घ्यावी.

अतिवृष्टी मदत बँक KYC

असे असले तरी सध्या स्थितीमध्ये बहुतांश शेतकऱ्यांची बँक खाते तात्पुरते लॉक किंवा फ्रिज असल्याचे वास्तव्यास आले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) शासकीय मदत जमा होऊनही त्यांनाही रक्कम काढता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मदत येण्यापूर्वीच जाऊन बँकेत केवायसी करून घ्यावी. Bank Kyc in marathi

केवायसी ( KYC ) कशी करावी ?

  • शेतकऱ्यांचे ज्या बँकेत बचत खाते ( Saving Bank Account ) असेल, त्या बँकेत जाऊन आधार कार्डची ( Aadhar Card ) झेरॉक्स प्रत जोडून बँकेच्या अधिकाऱ्यांना चौकशी करायची आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी. यामध्ये बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना नक्कीच सहकार्य करतील.
  • बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी केवायसी करण्यापूर्वी आपला आधार कार्ड अपडेट करून घ्यावा. ज्यामुळे केवायसी करताना कुठल्याही प्रकारची अडचण शेतकऱ्यांना येणार नाही.

खाते फ्रीज ( Freeze ) होणे म्हणजे काय ?

शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यातून सलग वर्षभर पैसे भरणे किंवा काढणे (money deposit or withdraw) अथवा कोणत्याही प्रकारचा व्यवहार त्या बँक खात्यातून वर्षभरामध्ये केलेला नसेल, तर अशा प्रकारची बँक खाते थेट फ्रिज होतात; म्हणजेच बंद पडतात.

See also  मतदान ओळखपत्रांशी आधार संलग्न करण्याचे अधिकाऱ्यांमार्फत आवाहन | link voter id card with aadhar card

खाते डॉरमंट ( Dormant ) होणे म्हणजे काय ?

शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यातून जर सलग सहा महिने पैसे भरणे किंवा काढणे अथवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार केलेला नसेल, तर अशा प्रकारची बँक खाते डॉरमंट स्थितीमध्ये जातात. म्हणजेच तात्पुरत्या काळासाठी अशा प्रकारची खाते बंद करण्यात येतात.

वरीलप्रमाणे दोन्हीपैकी एखाद्या स्थितीमध्ये तुमचे बँक खाते बंद झाले असल्यास, संबंधित बँकेमध्ये जाऊन तुमच्यामार्फत केवायसीची ( KYC ) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे बँक खाते पूर्ववत सक्रिय केले जाते; त्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेतून पैसे काढू शकता.