घोणस अळी नियंत्रण, काळजी, सूचना माहिती | Ghonas Ali Information in Marathi

Ghonas ali : शेतकरी मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांच्या चर्चेत असलेला विषय म्हणजे घोणस अळी (ghonas worm) शेतातील बांधावर, गवतावर, एरंड, आंब्याचे झाड इत्यादी ठिकाणी घोणस अळीचा झालेला प्रादुर्भाव दिसून येत आहे. घोणस अळीला इंग्रजीत ” स्लज कॅटरपिलर “ असे नाव आहे.

घोणस अळी शेत पिकांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा धोकादायक ठरत आहे; परंतू कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सूचना देण्यात आले आहेत की, या अळीला बघून शेतकऱ्यांनी घाबरायचं नाही, कारण घोणस अळीचा दंश झाला; तरी घोणस अळी विषारी नसल्यामुळे मृत्यू ओढवत नाही.

शेतकरी मित्रांनो, घोणस अळीला घाबरु नका. दंश झाल्यास जीवाला कोणताही धोका नाही.

Ghonas Insect not Dangerous

घोणस अळी शक्यतो पावसाळ्यात आढळते. अळीच्या अंगावर बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात. त्या विषग्रंथी मधूनच संरक्षणासाठी अळ्या विशिष्ट रसायन सोडत असतात. या रसायनाचा मानवी त्वचेची संपर्क झाल्यास तीव्र वेदना होतात. त्याचप्रमाणे अंगावर चट्टेसुद्धा दिसतात. ही अळी स्वतःहुन माणसाच्या अंगावर अथवा माणसाच्या दिशेने येत नाही. ॲलर्जी किंवा दमा ज्या व्यक्तींना असेल अशा व्यक्तीच्या संपर्कात ही आळी आल्यास त्या व्यक्तींना तीव्र वेदना होतात.

घोणस अळीचा दंश झाल्यास काय करावे?

1. घोणस अळीचा अचानक दंश झाल्यास, काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये चिकट टेप दंश झालेल्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा. असे केल्याने घोणस अळीचे दश करते वेळेस जे केस आपल्या त्वचेवर असतील ते सहजरीत्या चिकट टेप सोबत निघून जातील.

2. ज्या ठिकाणी घोणस अळीचा दश झाला आहे, त्या ठिकाणी थंड बर्फ, बेकिंग सोडा अथवा पाण्याची पेस्ट करून त्याचा लेप लावावा. यामुळे घोणस अळीचा दहशत झालेल्या व्यक्तींना काही प्रमाणात आराम मिळतो. घोणस अळीची लक्षणे तीव्र असल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी संपर्क करावा.

See also  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना : Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2022

घोणस अळी कुठे आढळते ?

  • घोणस अळी ही बहुभक्षी कीड म्हणजेच एकापेक्षा जास्त घटकांचे सेवन करणारी कीड असून बांधावरील गवतावर, झाडावर, पिकांवर दिसून येते.
  • एखाद्या परिसरात घोणस अळींचा मोठ्या प्रभाव झाल्यास त्याठीकाणातील पानांचा हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवतात.

घोणस अळीचे नियंत्रण

घोणस अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस ( 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये ), प्रोफोनोफोस ( 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये ), क्वीनऑलफास् ( 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये ), इमामेक्टिन बेंजोएट ( 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये ) नमूद प्रमाणामध्ये फवारणी केल्यास घोणस अळीच्या संक्रमणास आपण नियंत्रित ठेवू शकतो.

शेतकऱ्यांसाठी सूचना

  • शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना, पूर्ण अंग झाकेल अश्या प्रकारची कपडे घालावेत.
  • शेतातील व शेताच्या बांधावरील गवत स्वच्छ करावे.
  • घोणस अळीचा दंश झाल्यास सांगण्यात आलेले प्राथमिक उपचार करावेत
  • घोणस अळीचा दंश होऊन वेदना तीव्र असल्यास जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना संपर्क करावा.
  • शेतात घोणस अळी दिसून आल्यास; वेळीच अळीच्या नियंत्रणासाठी सांगण्यात आलेली औषध फवारणी करावी.