शालेय प्रवासासाठी वर्षाला 6,000 रु. मिळणार : Student Transport allowance Scheme

Student Transport allowance Scheme : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, निवासी भत्ता, शालेय उपयोगी वस्तू याप्रमाणेच आता शालेय प्रवासासाठीसुद्धा शासनाकडून वर्षाला 6,000 रु. इतकी रक्कम मिळणार आहे. विविध जिल्ह्यातील ज्या शाळांची मान्यता रद्द झाली किंवा शाळा बंद पडली, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्यात येणार आहे.

Student Transport allowance Scheme

समायोजन करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमधील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नसतील अश्या विद्यार्थ्यांना प्रवास खर्च म्हणून दरमहा 6,00 याप्रमाणे वर्षाला 6 हजार रु. एक रकमी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी चालू करण्यात आलेली ही तरतूद पुणे, मुंबई पालिकामधील विद्यार्थ्यांसाठी लागू असणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता योजना

शासनाच्या नियमानुसार 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येते व त्या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समायोजित केलं जातं. त्यानुसार राज्यातील अश्या विद्यार्थ्यांचे संख्या निश्चित करण्यात आलेली असून, त्यातील आई किंवा वडील नसलेली विद्यार्थी किंवा त्यांच्यासोबत न राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. अश्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये; म्हणून दरमहा त्यांना 600 रुपये वाहतूक भत्ता दिला जाणार आहे.

हे सुध्दा वाचा : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ( 1.50 लाखापर्यंत आर्थिक मदत )

आधार बँकखात लिंक आवश्यक

विद्यार्थ्यांच्या आधारसोबत लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती अपडेट करण्यात येणार असून, ही माहिती डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येऊन जानेवारीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती निधी वाटप करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडून देण्यात आलेले आहे.

See also  Mahajob Portal 2021: Online Registration at mahajobs.maharashtra.gov.in

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या 15,088 विद्यार्थ्यांसाठी 9 कोटी 5 लाख 88 हजार इतका निधी, तर शहरी भागातील 3,874 विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी 32 लाख 74 हजार रुपयांचा निधी आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या 744 विद्यार्थ्यांसाठी 44 लाख 64 हजार रुपयांचा निधी शालेय व क्रीडा विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे.

आधरला बँक खाते लिंक केले का ?

राज्य शासनाकडून प्रवास खर्च म्हणून 6 हजार रुपये प्रति वर्ष मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे का? याबाबत तपासणी करणे आवश्यक आहे. बँक खात्याला आधार लिंक नसल्यास संबंधित बँकेत जाऊन विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आधार लिंकची प्रक्रिया करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

जानेवारीत मिळणार विद्यार्थ्यांना पैसे

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये; म्हणून त्यांचा प्रवासाचा खर्च शासनाकडून उचलला जातो. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना येत्या जानेवारी महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत.

प्रवास भत्ता म्हणून विद्यार्थ्यांना किती मदत दिली जाईल ?

प्रवासासाठी विद्यार्थ्यांना 600 रुपये दरमहा दिले जातील.

कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी रक्कम दिली जाईल ?

ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडीलांचा मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांना रक्कम देण्यात येईल.

प्रवास भत्ता मिळवण्यासाठी बँक खात्याला आधार लिंक आवश्यक आहे का ?

हो