दिवाळीपूर्वी दहा लाख शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळणार | Pradhan Mantri Pik Vima 2022

Pradhan Mantri Pik Vima 2022 : राज्यातील सततच्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसान भरपाईपोटी राज्यातील जवळपास 41.63 लाख शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

त्यातील 10.59 लाख शेतकऱ्यांच्या तक्रारीचा उपाय काढण्यात आला असून, या चालू वर्षातील पीक नुकसान भरपाईपोटी पीक विमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी बँक खात्यात 836 कोटी इतक्या रुपयांचा निधी (Fund) जमा केला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री पीक विमा 2002 महाराष्ट्र | Pradhan Mantri Pik Vima 2022

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यानंतर पीक नुकसान संदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनी (Insurance Company) कृषी विभाग यांच्याकडे तक्रारी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जवळपास 41.63 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.

हे सुध्दा वाचा : महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजनांचे या तारखेला 50 हजार अनुदान जमा होणार

यापैकी 30 लाख 56 हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षणाचे काम चालू आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत यातील 10.59 लाख शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निवारा करण्यात येणार असून, या संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 836 कोटी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिवाळी गोड जावी या हेतूने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे.

याउलट उर्वरित 11 लाख 07 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारीचे सर्वेक्षण चालू असून, यादरम्यान 17 ऑक्टोबरपर्यंत ४९७४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2.63 कोटी पीक नुकसान भरपाई जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

See also  स्वाधार योजना काय आहे ? Maharashtra Swadhar Yojana 2022 in Marathi